मनिवाईज वित्तीय साक्षरता च्या वर्धापन दिनानिमित्य रक्तदान शिबीर ........

मनी वाइज वित्तीय साक्षरताच्या वर्धापन दिनानिमित्त रक्त दान शिबीर..


कारंजा-शहर प्रतिनिधी/09जून


-         रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि यांचं सहकार्याने क्रिसिल फाउंडेशन वाशिम जिल्हा मध्ये आर्थिक साक्षरता हा कार्यक्रम गेल्या ऑक्टोबर 2017 पासून कारंजा, मंगरूपीर, रिसोड, मालेगाव आणि मनोरा या तालुक्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक साक्षर करण्याकरिता राबवित आहे. या कार्याचा एक भाग म्हणजे मनीवाइज वित्तीय साक्षरता तालूका समिती या समितीला गावातील लोकांना आर्थिक साक्षर करण्या करीता घरगुती अर्थ संकल्प तयार करणे, बँक सेवा चा लाभ घेणे, इतर फसवणुकी पासुन सावध राहणे, डिजिटल व्यवहार चा वापर करणे सोबतच विमा पेन्शन आदी बद्दल लोकांना जागृत करण्याचे कार्य सुरू आहे.कारंजा तालुक्यातील 15 वित्तीय ग्राम समितीच्या बँक समस्या आणि शासकीय योजना ची सविस्तर माहिती व मार्गदर्शन वेळोवेळी करीत आहे.हे कार्य करीत असताना या मनीवइज वित्तीय साक्षरता तालुका समितीला 8 मे 2020 रोजी एक वर्ष पूर्ण झाली. मात्र लॉकडाऊन असल्याने या समितीचा वर्धापन दिन हा 7 जून 2020 रोजी शासनाच्या नियमाचे पालन करीत कारंजा येथील महेश भवन या ठिकाणी आर्ट ऑफ लिविंग आणी मनीवाइज वित्तीय साक्षरता तालुका समितीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.


    या ठिकाणी आलेल्या लोकांना गोपीनाथ अपघात विमा, प्रधान मंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा ची माहिती मनीवाइज वित्तीय साक्षरता केंद्र कारंजाचे कर्मचारी श्याम ठाकरे व गणेश गावंडे यांनी दिली. मनीवाइज वित्तीय साक्षरता समिती व केंद्राच्या कार्याची माहिती या कार्यक्रमास उपस्थित तहसीलदार धीरज मांजरे यांनी सुद्धा घेतली.


    सदर कार्यक्रमाला मनी वाइज तालुका समितीचे अध्यक्ष गजानन नेमाने, सचिन हाते, आशा अंबाळकर, अ अलीम अ. लतीफ, अंकुश मुंदे, ललित तायडे, उषा वरघट, धम्मदीप वानखडे, शिरीष चौधरी, गोपाळ काळे, संजय लोखंडे आदी उपस्थित होते.


सदर कार्यक्रम हा राज्य समन्वयक शक्ती भिसे आणि जिल्ह्य समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.