शाळा सुरु करने कसोटीचे राज्यसरकारच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला पालक वर्गाच्या शोसल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या काही एक प्रतिक्रिया

शाळा सुरु करने कसोटीचे राज्यसरकारच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला पालक वर्गाच्या शोसल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या काही एक प्रतिक्रिया


कारंजा : (कारंजा वृत्तकेसरी)


        राज्य सरकार तर्फे नुकतेच सर्वच शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करने बाबत चा विचार जाहिर करण्यात आला 


शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला निर्णय चांगला आहे शाळा सुरु झाल्याच पाहिजे परंतु दूसरी बाजू पाहली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीपासून ते मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरची व्यवस्था करणे ही बाब काही शाळांच्या आवाक्याबाहेरची असु शकते त्यामुळे आॅगस्टअखेरही शाळा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे शिक्षण तज्ज्ञाकडून बोलले जात आहे.


        असे असूनही शाळा बंद आहेत; पण शिक्षण सुरू आहे. असा उपक्रम शिक्षण विभागाने सुरू केला आहे. शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे आॅनलाइन शिक्षण द्यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत; एका माहिती नुसार काही शाळांमध्ये वीज कनेक्शनच नाही, तर इंटरनेट कुठून असणार? शहरातील शाळांमध्ये संगणक, इंटरनेट आहेत; परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणकही नाहीत आणि इंटरनेटही नाही. त्यामुळे आॅनलाइन शिक्षणाची सोय होणार कोठे हा एक प्रश्न आहे 


सद्या राज्यसरकार च्या शाळा सुरु करण्याच्या निर्णया विरोधात पालक वर्गामधुन निरनिराळ्या प्रतिक्रिया शोसल मीडिया वर उमटत आहे त्यामधील एक प्रतिक्रिया काय आहे ते पाहु ही प्रतिक्रिया शोसल मिडियास वर जास्त व्हायरल होताना दिसत आहे 


   


शोसल मीडिया वर व्हायरल होत असलेली पोस्ट 


 *खालील पैकी ऐका जरी प्रश्नाचे उत्तर देता आले तर नक्की शाळा सुरू करा...*


1) *कोरोनावर खात्रीशीर औषध सापडले आहे का* ?*


2) *लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता कमी नसते का ?*


3) *प्रत्येक बेंचवर ऐक विद्यार्धी बसवाल...पण सध्या ऐका बेंचवर तीन तीन विद्य़ार्धी दाटीवाटीने बसविले जातात.. त्या पटसंख्येच्या मानाने..जास्त बेंच व खोल्या लागतील...त्या कशा उपलब्द करणार ?*


4) *शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार ?*


5) *मधल्या सुट्टीत टाँयलेट मध्ये गर्दी होते त्याचे नियोजन काय ?*


6) *जिथे शहाणे माणसे ऐकत नाहीत... तिथे लहान मुले ऐकतील का ?*


7) *मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतय सांगता येते...लहान मुले सांगु शकतील का ?*


8) *सर्व व्यवस्थित आहे हे दाखविण्यासाठी या साठी शाळा सुरू करायच्या आहेत का ?*


9) *या तीन महिन्यात मुले जे नाही ते करत आहेत हे पालकांनी जवळुन पाहीलेले आहे...तरी ते शाळेत पाठवतील का ?*


10) *प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य आहे का ?*


11) *पहिले काही दिवस नियम पाळले जातील पण नंतर दुर्लक्ष होणार नाही का ?*


12) *शाळेत संसर्ग झाला तर शालेय संस्था जबाबदारी स्विकारुन पुढील सहकार्य करतील का हात झटकुन जबाबदारी टाळतील ?*


13) *मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा.. लोकसभा व विधानसभा चालु करुन कोरोना संसर्ग वाढतो कि नाही हे पाहणे जास्त योग्य वाटत नाही का ?*


14) *स्कुल बस..रिक्षावाले मुलांची ने आण करताना नियम पाळतील ?*                    


15) *उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला व्हायरसची लागण झाली तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना क्वारांटाईन करावे लागेल. शिक्षकांना हि करावे लागेल.*


16) *क्वारांटाईनकरीता आपल्या मुलाला /मुलीला एकटे सोडण्याची कुठल्या पालकांची तयारी होईल*.         


 17) *बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा 2 अपत्ये आहेत ,जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार ?*


*18) शिक्षण महत्त्वाचे की जीवन? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर असे किती नुकसान होणार आहे?* 


 


( शोसल मीडिया वरील व्हायरल होत असलेली पोस्ट जशी च्या तशी  वाचकाना करिता मांडली आहे)