व्यापारी जनता कर्फ्यू ' ला नागरिकांसह व्यापारी महासंघा चा भरभरूंन प्रतिसाद! कोरोना च्या काळात व्यापारी एकसंघ चा कारंजेकरानी अनुभवला सुखद क्षण

"व्यापारी जनता कर्फ्यू ' ला नागरिकांसह व्यापारी महासंघा चा भरभरूंन प्रतिसाद!


 कोरोना च्या काळात व्यापारी एकसंघ चा कारंजेकरानी अनुभवला सुखद क्षण


 


कारंजा : (रामदास मिसाळ) दि १८


         कारंजा शहरामध्ये कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच दिवसेंदिवस कारंजेकरानी व स्थानीक सर्व व्यापारी संघटनेने एकत्रित येवून कोरोनाचाच पराभव करण्याचे ठरविले आणि सर्वानी म्हणजे व्यापारी मंडळीनी नागरिकांच्या सहकार्याने पूर्ण ४ दिवसाचा व्यापारी जनता कर्फ्यू लागू करण्याची सहमती चे निवेदन तहसीलदार धीरज मांजरे यांना दिले


       यावेळी तहसीलदार मांजरे यानी अनुकूल सहमति दाखवित या व्यापारी जनता कर्फ्यू मंजूरी देवून व्यापारी प्रतिनिधिना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वाशीत केले परिणामी याची फलश्रुती म्हणून व्यापारी एकता आज शहरात पाहण्यास मिळाली व्यापारी मंडळणी दिलेल्या निवेदनाची दखल कारंजावासियांनी चांगलीच मनापासून घेतलेली आजरोजी दिसली


      शहरात अत्यावशक्य सेवे मध्ये दवाखाने, मेडिकल,कृषी सेवा केंद्र,व बैंका वगळता व्यापारी जनता कर्फ्यु च्या १००% कडकडीत बंद यशश्वी करुण दाखवून दिला .दिनांक 18 ते 21 पर्यंत कारंजातील दुकाने बंद आहे. जनता व व्यापारी कोरोना ची साखळी तोडण्याकरिता सज्ज झाले आहे.   


      कोरोना सारख्या आजारापुढे अनेक देशानी हात टेकले आहेत परंतु कारंजेकरांनी हार न मानन्याचे ठरविले आहे आणि म्हणूनच पुढील ३ दिवस सुद्धा कडकडित बंद राहणार आहे या करीता व्यापारी महासंघ हा व्यापारी जनता कर्फ्यू सफल करने करिता पूर्ण ताक़दनीषी रस्त्यावर उतरला असल्याचे दिसत आहे


          दि १८ ते २१ पर्यन्त च्या बंदला कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती, किराना व्यापारी,कपड़ाव्यापारी,सराफा व्यापारी,जनरल स्टोर्स व्यापारी,इलेक्ट्रिल्स व्यापारी, देशी विदेशी मद्य विक्रेते,भजिपाला विक्रेते , तसेच सर्व लहान मोठे व्यापारी मंडळानी एकत्र येवून व्यापारी महासंघ होऊन नागरिकांना विश्वासात घेवून हा कोरोना ला हरविन्या करिता कारंजा बाजारपेठ शतप्रतिशत बंद ठेवली आहे 


 


         "कारंजातील व्यापारी महासंघाने कोरोना महामारी च्य वाढत्या संसर्गमुळे दिनांक 18 जून ते 21 जून पर्यंत बंद चे आव्हान केले होते ,कारंजातील समस्त व्यापारी व तमाम नागरिक मंडळी नी आज दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हे १००% बंद झाले , आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार वेळे आभावी सर्व व्यापारी मंडळी पर्यंत आम्ही पोहचु शकलो नाही त्याबद्दल दिलदारी व्यक्त करतो , आपणास काही अड़चन असल्यास आम्हाला संपर्क करू शकता.व्यापारी महासंघ आपल्या सोबत आहे


           आकाश भास्करराव क-हे


        अध्यक्ष, सराफ़ा सुवर्णकार अशोसिएशन,कारंजा