वाशिम जिल्ह्यात आढळले आज ५ कोेरोना पॉझिटिव्ह पैकी ४ कारंजा तर १ वाशिम तालुक्यातील रुग्ण जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २५ एक्टिव पॉझेटिव्ह १८

वाशिम जिल्ह्यात आढळले आज ५ कोेरोना पॉझिटिव्ह पैकी ४ कारंजा तर १ वाशिम तालुक्यातील रुग्ण


   जील्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २५ 


एक्टिव पॉझेटिव्ह १८


 


     कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी) दि.११ - 


          वाशिम जिल्ह्यात आज पुन्हा ५ जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ५ पैकी ४ हे कारंजा तालुक्यातील तर १ हा वाशिम तालुक्यातील आहे. 


कारंजा येथील ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 


      दरम्यान, कारंजा तालुक्यात आज ४ कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. यांत शहरातील रेस्ट हाऊस परिसरात राहणारे ५३ वर्षीय इसमाचा समावेश आहे. सदरहू व्यक्तीला कोरोना संसर्गाची लक्षणे असल्याने खाजगी रुग्णालयाने रेफर केले होते. 


      कारंजा तालुक्यातील ग्राम सुकळी येथील एकाच परिवारातील ३ जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. यांत ३२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला व २ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. हे सर्व दिल्ली येथून आले होते तसेच यांना आयएलएल चे लक्षणे दिसून आली होती. 


बोराळा येथील युवकाचे संपर्कातील एक वाशिम तालुक्यातीलबो राळा हिस्से येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदरहू व्यक्ती हा पुर्वीच बाधीत असलेल्या युवकाचे संपर्कातील होता. 


    यामुळे आता जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्वा ही १८ झाली असून एकुण रुग्ण संख्या ही २५ झाली आहे. प्रशासनाने संबंधीत रुग्णांचे संपर्कांतील लोकांची माहिती घेणे सुरु केले