चिंता वाढली पण घाबराचे कारण नाही
कारंजा शहर परिसरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९ तर तालूक्यात १४
एक्टिव १३
जिल्ह्यात आतापर्यंत पाठवलेले स्त्राव नमूने ६७९
पोझिटिव्ह ५२
निगेटिव्ह ६२२
प्रलंबित अहवाल ५
डिस्चार्ज १०
मृत्यु. २
एक्टिव रुग्ण ४२
दादगांव च्या महिलेल्या केले डिस्चार्ज
नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाचे सुचनांचे पालन करावे
कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी) दि.१४ -
आज सकाळी आलेल्यां अहवाला मध्ये गांधी चौकातील त्या व्यक्तीचे संपर्कातील ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आणखी त्याच परिवरातील ४ जनांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आहे अमरावती येथे संबंधीत व्यक्ती व त्यांचे पत्नीचा कोरोना विषयक चाचणी अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. कारंजा शहर परिसरातील एकुण कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या ही आज ९ झाली आहे . तर तालुक्यातील दादगांव (१), शेमलाई (१), सुकळी(३) येथील ५ व्यक्ती असे एकुण १४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून यांतील १३ हे ऍक्टीव रुग्ण आहेत.
स्थानीक गांधी चौक परिसरातील एक ६५ वर्षीय गृहस्थ ,व त्यांच्या पत्नी हे अमरावती येथे झालेले कोरोना विषयक चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. त्यांचे परिवारातील एकुण ६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. आज रोजी त्यांचे परिवारातील २३ जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आल्याची माहिती असून त्यांचा रिपोर्ट हा उद्या येण्याची शक्यता आहे
शिवाय नम: मठाजवळील गृहस्थ हे पॉझिटिव्ह आल्यानंतर कालच आलेल्या रिपार्ट मध्ये त्यांची पत्नी व मुलगीही कोरोना बाधीत आली होते. त्यांचे संपर्कातील इतर काही व्यक्तींचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते.
नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाचे सुचनांचे पालन करन्याचे प्रशासना तर्फे आवाहन करण्यात आले आहे