नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून गर्दी करू नये
बाहेर पडल्यावर मास्क वापरून सामाजिक अंतरांचे पालन करा
सर्व व्यापारी मित्रानी सामाजिक अंतर पाळणे गरजेचे
तहसिलदार धिरज मांजरे यांचे जनतेला आवाहन
कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी) दि.११ -
कारंजा तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरुन गर्दी करु नये, मास्क वापरा, सामाजिक अंतराचे पुर्ण पालन करा. बाहेर पडतांना दोन व्यक्तींमधील अंतर हे ६ फुटाचे वर असु द्यावे असे आवाहन तहसिलदार तथा कोव्हीड चे नोडल अधिकारी धिरज मांजरे यांनी जनतेला केले आहे.
याबाबत त्यांनी एक ऑडियो प्रक्षेपीत केला असून याद्वारे जनतेला संदेश दिलेला आहे. तालुक्यातील ग्राम दादगांव, शेमलाई, वालाई,सुकळी या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. कारंजा शहरातही रेस्ट हाऊस जवळील ओम नम:शिवाय मठाजवळ रुग्ण आढळून आला असून नागरिकांनी आता खुप सतर्क राहणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले आहे. विनाकारण घरा बाहेर पडू नका. भाजीपाला, फळे, कापड दुकान आदींमध्ये गेल्यावर वस्तुंना हात लावले वर सॅनिटाईझरचा वापर करा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
दुकाने व प्रतिष्ठाणांनी कार्य करतांना सामाजिक अंतराचे पुर्ण पालन करणे गरजेचे आहे. गिर्हाईकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवा. मास्कचा वापर करा. दुकानात येणारे तसेच दुकानातून जाणारे गिर्हाईक यांना योग्य प्रकारे सॅनिटाईजर चा वापर करण्यास लावणे दुकानदारांना गरजेचे आहे. तसेच आपले दुकानात काम करणारे कर्मचार्यांनीही दुकानात नियमांचेपालन करावेत याची जबाबदारी संबंधीत दुकानदारावरच आहे.