कोरोना चा वाढता कहर पाहता कारंजातील सर्व मद्य विक्रेते स्वयंस्फुर्तीने पाळणार ४ दिवस मद्य विक्री बंद,
१८ ते २१ जून दरम्यान ४ दिवस मद्य विक्री बंद
कारंजा :(संदीप क़ुर्हे)दि १७
संपूर्ण कारंजा शहरात कोरोना वाढता प्रभाव पाहता जनता भयभीत झाल्याचे चित्र आहे धक्यावर धक्के देत कोरोना ने शहरात चांगलेच पाय रोवले आहेत तालुक्यासह कारंजात आज २२ रुग्ण ओषधोपचार घेत आहेत शिवाय बरेच शे टेस्टिंग नमूने प्रलंबित आहेत
कोरोनाची वाढती दहशत पाहता कारंजातील सूजनशील व्यापारी संगटनेने पूर्ण कारंजा बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाला सहकार्या करण्याचे निवेदन तहसीलदार कारंजा यांना दिले आहे निवेदनात १८ ते २१ जून पर्यन्त सर्व मद्य विक्री बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे सोबतच किराना,सराफा, कापड जनरल स्टोर्स, तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी च्या सह्या आहेत