कारंजा येथील पांजरापोळ गोरक्षण संस्थेच्या रिक्त जागेवर ब्रिजमोहन मालपाणी यांची अद्यक्षपदी निवड
कारंजा (कारंजा वृत्तकेसरी)
श्री ब्रीजमोहन मालपाणी कारंजा येथील श्री यशोदा दाल मिल चे मालक असून प्रसिद्ध उद्योजक आहेत गोरक्षण संस्था चे पलाना ता.कारंजा येथे स्थावर असून तेथे गाई चे दोन मोठे शेड , कुटार, कडबा साठवण्या करीता दोन गोडाऊन व 130 एक्कर शेतजमीन आहे सद्य स्थितीत 123 गोवंश असून त्यांचे करीता पिण्याचे पाणी हौद , गोठा आहे तसेच कारंजा येथे देखील सस्थेने गोवंश करीता मोठे शेड उभारले आहे व स्व मालकीचे कार्यालय आहे सस्थेच्या आमसभेस सर्व विश्वस्त उपस्थित होते
सभेचे संचलन व प्रस्ताविक आशिष तांबोळकर यांनी केले सभेचे अध्यक्ष श्री राजाराम भुतडा यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री ब्रिजमोह न मालपाणी यांचे स्वागत करून सर्वांचे आभार मानले सभेस सर्वश्री सुभाष बजाज,विजय बगडे, शालिग्रामजी भिवरकर ,शेखर बंग,अशोक इन्नानी ,मनोज अग्रवाल,अमल चवरे ,प्रमोद चवरे,राजकुमार बंग,श्रीराम इंगळे ,राजेश बजाज, पदम देवडा ,आशिष तांबोळकर ,राजाराम भुतडा ललित चांडक उपस्थित होते