* मेमन समाजाने मेमन जमातखाना क्वारंटाईन सेंटर साठी देवून ठेवला समाजापुढे आदर्श

*मेमन जमातखाना क्वारंटाईन सेंटर साठी देण्याचा कारंजा मेमन सोसायटीने घेतला निर्णय* 


*समाज हितार्थ कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्यासाठी पुढाकार* 


कारंजा: दि.१४ -


       रंजासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून गेल्या तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. याआधी कारंजा शहरात एकाही पेशंटला कोरोनाचा संसर्ग झालेला नव्हता, संपूर्ण देशात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिम समाजाच्या वतीने पुर्वीही जकारिया मदरसा देखील क्वारंटाईन सेंटर म्हणून  वापर करणेसाठी देण्यात आला होता. तिथे राज्याबाहेरील लोक आणि जिल्ह्यातील बाहेरील लोक क्वारंटाइन करण्यात आले होते. शहराबाहेरून येणारे वाढते प्रमाण आणि वाढती रूग्ण संख्या पाहता मेमन जमातच्या अधिका-यांनी ’सामाजिक अंतर’ राखुन एक बैठक घेतली आणि यामध्ये तो जमात खाना क्वारंटाईन सेंटर म्हणून देणेसाठी एकमताने ठराव घेतला. याबाबतचे एक पत्र तहसिलदार धिरज मांजरे यांना एका शिष्टमंडळाचे वतीने देण्यात आले. 


निवेदनात नमुद केले नुसार, इलेक्ट्रॉनिक कनेक्शन, पंखे, स्वच्छता गृह, पार्किंगची सुविधा देण्याची तयारी दर्शविली आहे. येथे आलेल्या नागरिकांना न्याहारी, जेवणाची व्यवस्था व पोलिस तैनात करण्याची व शासकीय कर्मचार्‌यांची व्यवस्था करण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी असे या निवेदनात म्हटले आहे. शासकीय आदेशानुसार लॉकडाऊन हटेपर्यंत जमातखाना देण्याची बाब पत्रामध्ये लिहिलेली आहे.तहसिलदार यांना निवेदन देतांना कारंजा मेमन समाजाचे अध्यक्ष हाजी आरिफ भोगानी, हाजी मो. शफी सेठ पुंजानी, अस्लम ममदानी, अ.रज्जाक मरछिया, हाजी मो. फारूक पोपटे , सचिव सलीम भाई अकबानी, जावेद अकबानी, आरिफ पोपटे आदी उपस्थित होते. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत प्रशासनाचे वतीेने क्वारंटाईन सेंटर बनविणे बाबत आढावा घेतला आहे. ९,००० चौरस फूट जागांच्या या हॉलमध्ये एकाच वेळी ८० जणांना अलग ठेवता येऊ शकते.