कारंजा लाड येथील रामासावजी चौकात धापा टाकण्यात यावा
संदेश जैन जिंतुरकर व अब्दुल राजिक शेख ह्यांची मागणी
कारंजा लाड --( प्रतीनिधी)
पावसाळा सुरू झाला की कारंजा लाड शहरात बहुतेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडत असतात आणि ही समस्या दरवर्षी भेडसावत असते. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर इतर दिवसात ही नालीत कचरा जमा झाला कि घाण पाणी रस्त्यावर येऊन त्याची दुर्गंधी पसरते व जाण्यायेण्यास अडथळा निर्माण होतो
शहरातील रामासावजी चौक येथे तर थोडे पाणी सुध्दा आले तर नाली पूर्ण भरून ते अतिशय घाण पाणी रस्त्यावर उतरून रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त होते व ते पाणी घाण असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातुनच चालावे लागते . लोकांना घाण पाण्यातुन वाहन चालवितांना तारे वरची कसरत करावी लागत आहे. पायी तर जावुच शकत नाही
रामासावजी चौक व परिसरात श्री. गुरू मंदिर , जैन मंदिर, विठ्ठल मंदिर, गजानन महाराज मंदिर , कामक्षा माता मंदिर व हनुमान मंदिर तसेच मस्जिद सुध्दा आहेत आणि त्याच परिसरात अनेक शाळा सुध्दा आहेत त्याच बरोबर पोलिस स्टेशन , नगर परिषद व दुय्यम निबंधक कार्यालय सारखे महत्वपूर्ण शासकीय कार्यालय सुध्दा याच परिसरात आहे त्यामुळे ह्या सवॅ ठिकाणी जायचे असेल तर रामासावजी चौकातूनच जावे लागते
ह्या परिसरातुन भाविक विविध मंदिर- मस्जिद मध्ये जात असतात तसेच ह्या परिसरात शाळा असल्यामुळे विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणावर जाणं येणं करतात तसेच शहरातील मुख्य दवाखाने याच परिसरात आहे त्यामुळे शहर व तालुक्यातील येथे येत असलेल्या रुग्णांची या साचलेल्या घाण पाण्यामुळे येणे जाने करण्यास अडचणीचे होते तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास या घाण पाण्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात गणपती बाप्पा व दुर्गा देवी विसर्जन मिरवणुक त्याच प्रमाणे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शोभायात्रा व पालखी सूध्दा ह्याच मार्गाने काढल्या जातात आणी हया दरम्यान मुसळधार पाऊस आला तर मात्र नाल्या तुडुंब भरून त्यातील घाण पाणी रस्त्यावर येते आणि त्यातील तुटलेले प्लॅस्टिक , कांच व इतर टोकदार वस्तु पाण्यातुन बाहेर येऊन त्यातुन जाणं येनं करतांना लोकांच्या तळपायाला जखम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधी कधी तर वाहन चालवितांना एकमेकांच्या आंगावर घाणं पाण्याचे शिंतोडे उडण्याचे प्रकार ही घडले आहेत अश्यावेळेस परिस्थिति हमरीतुमरी वर येऊ शकते त्यामुळे रामासावजी चौकात हनुमान मंदिर जवळ धापा टाकण्यात यावा तसेच शहरात जिथे जिथे असे प्रकार घडतात तिथे तिथे धापा टाकण्यात यावा
जेने करुन भविष्यात तेथे घाण पाणी साचणार नाही .
तसेच शहरातील नाल्या ह्या 2/3 फुट खोल असुन सुध्दा त्याचा तेवढा उपसा करण्यात येत नाही . मागील एक वर्षापासून सदरहु नाल्यांमध्ये 2/3 फुटाचा गाळ साचलेला आहे सदरहु नाल्यातील 2/3 फुटापयॅंत साचलेला गाळ पावसाळया अगोदर काढणे आवश्यक असते परंतु त्याप्रकारची कुठलीही मोहीम यावर्षी राबविल्या गेली नाही नगर परिषद च्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ह्या नालींच्या दुरावस्थेची प्रत्यक्ष पाहणी करुन त्वरीत धापा टाकण्याचे काम सुरु करावे अशी मागणी वाशिम जिल्हा कांग्रेस सेवादला चे सरचिटणीस सामाजिक कार्यकर्ता अब्दुल राजिक शेख व वाशिम जिल्हा कांग्रेस सेवादल चे जिल्हा समन्वयक अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी मुख्याधिकारी ह्यांना एका निवेदना द्वारे केली आहे