वाशिम जिल्ह्यात आजच्या अहवालात ७ व्यक्तिचे नमूने पोझिटिव्ह प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण

जिल्ह्यात आजच्या अहवालात  ७ व्यक्तींचे अहवाल 'पॉझिटिव्ह'


 


जिल्ह्यात एकूण एक्टिव  ४०


कारंजा शहर                    २


शेलुबाजार                       १


रिसोड                            ३


बोराळा हिस्से                  १


 


कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी)दि १३


        वाशिम जिल्ह्यात कोरोनामुळे स्थिती चिघळत असल्याचे चित्र निर्माण होतांना दिसत आहे  आज आलेल्या अहवाला नुसार तब्बल ४२ नमूने निगेटिव्ह आले असून फक्त ७ नमूने हे पोझेटिव्ह आले आहेत त्यापैकी  बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील ३२ वर्षीय महिलेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. सदर महिला बोराळा हिस्से येथील १० जून रोजी 'पॉझिटिव्ह' अहवाल आलेल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.


        कारंजा लाड विश्रामगृह परिसरातील कोरोना बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील ४५ वर्षीय महिला व १५ वर्षीय युवतीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.


      औरंगाबाद येथून रिसोड येथे आलेल्या २०, २४ व २७ वर्षीय युवकांचे कोरोना विषयक चाचणी अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत.


      लुबाजार (ता. मंगरुळपीर) येथील ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर व्यक्तीला कोरोनाची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयातून 'रेफर' करण्यात आले होते. सद्या स्थितीत कारंजा शहरात २ परिसरात प्रतिबंधीत क्षेत्र ( काँटेन्टमेंट क्षेत्र) म्हणून जाहिर करण्यात आले आहेत पैकी गांधी चौक परिसर व शिवायनम: मठ(विश्राम गृह परिसर) हे सील करण्यात असले तरी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटिल सह तहसीलदार धीरज मांजरे,पोलिस निरीक्षक सतीश पाटिल  परिस्थिति  वर लक्ष्य ठेवून आहेत