महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिबीरात ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिबीरात ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान*


कारंजा: ( प्रतिनिधी) 


    कोरोनाच्या संकटकाळात राज्यात रक्ताचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रक्ताची पुरेशी उपलब्धता निर्माण व्हावी या दृष्टीने हिंदू जननायक *मा. राजसाहेब ठाकरे* यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नवनिर्माण फाऊंडेशनच्या वतिने १४ जुन २०२० रोजी पोले पाटील हाॅल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


 रक्त संकलन अभियान अंतर्गत अनुप ठाकरे, अध्यक्ष नवनिर्माण फाऊंडेशन कारंजा यांच्या नेतृत्वात शिबीराचे उद्घाटन जेष्ठ नागरिक श्री. विनोदराव काळे याच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात एकुण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


 आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण आपण वाचवू शकतो ही कल्पनाच समाधान देनारी असल्याचे मत श्री. अनुप ठाकरे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले तर समारोपीय भाषण श्री. अरविंद भगत यांनी ४२ रक्तदात्यांचे आभार मानले.


  प्रामुख्याने उपस्थिती मनिष डांगे, रवि मुडतकर, सत्येंद्र बंदीवान, अमोल घाने, माणिक राठोड़, रवि राऊत, अशोक जाधव, प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. 


     यावेळी ४२ युनिट रक्त संकलीत करण्याचे कार्य अकोला येथील जिल्हा स्ञि रुग्णालय रक्त पेढीचे डॉ. सुनिल जोशी, किशोर बयस , सोनळे सिस्टर, आनंद वाकोडे, अरविंद बनसोड यांच्या चंमुने केले . यावेळी आकाश राठी, पुंडलीक लसनकुटे, संतोष टेकाडे,विनोद खोंड चेतन यंडोले, निखिल शिरगरे, पवण मिसाळ, नरेश कराळे आदिसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.