*
प्रशासनाने बोलावाली तातडीची बैठक
कारंजा १८
कारंजा ग्रामीण ५
डिस्चार्ज ग्रामीण १
कारंजा:( प्रतिनिधी)दि १६
आज दुपारी व सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५ झाली आहे.दुपारी आलेल्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील एकाच कुटुंबातील ४१ वर्षीय पुरुष व १३ वर्षीय मुलाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर कुटुंब डोंबिवली, मुंबई येथून आले होते. या कुटुंबातील ४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शेलूबाजार येथील एका ३० वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर महिला १३ जून रोजी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. पहाटे पहाटे आलेल्या अहवाला नुसार ६ रुग्णाचा अहवाल हा पोझेटिव्ह आला होता हे सर्व गांधी चौकातील कोरोना बधिताच्या संपर्कातील आहेत
सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कारंजा येथील माळीपूरा भागातील ३ व्यक्तींना कोरोन विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये दोन ३६ वर्षीय पुरुष व एका २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. यापैकी १ हा सुकळी च्या रुग्णाच्या संपर्कातील तर
बाकीचे दोन हे शिवाय:नम मठ परिसरातील बाधीतच्या संपर्कातील आहेत
प्रशासनाने घेतली बैठक
कॉरंटॉईन सेंटरची केली पाहणी
शहरात अचानक वाढत असलेले रुग्णांची संख्या पाहता, प्रशासनाचे वतीनेही दुपारी ५ वाजताच्या दरम्यान अधिकार्यांची स्थानिक विश्रामगृहाला बैठकी चे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पालिका प्रशासन,पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, मेडिकल सुपरिटेंडेंट, वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित होते यामध्ये शहरातील वाढते कोरोना रुग्णांची संख्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच उपाययोजना बाबतही विचार विमर्श करण्यात आले यानंतर उपलब्ध सोयी सुविधा तसेच इतर बाबींची तपासणी करणेसाठी अधिकार्यांनी उपजिल्हा रुग्णालय कोरांटीएन सेंटर ची पाहणी केली
प्रशासनाचे निर्देशांचे पालन करावे तहसिलदार मांजरे
नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देशांचे पालन करावे तसेच आनवश्यक फिरू नये, मास्क वापरावे सोशियल डिस्टेंसिंग ठेवावी, गर्दी करू नये असे आवाहनही तहसिलदार धीरज मांजरे यांनी केले आहे