कारंजात कोरोनाने घेतला पहिला बळी
सुरक्षीतता बाळगा -प्रशासनाचे आवाहन
कारंजा (प्रतिनिधि ) दि.१७ -
कोरोनाने कारंजात पहिला बळी घेतला असून कारंजातील महिला ही अकोला येथे पॉझिटिव्ह आली आहे. भीमनगर येथील ५२ वर्षीय महिला ही अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू पावल्याची माहिती तहसिलदार धिरज मांजरे यांनी प्रतिनिधि ला बोलतांना दिली.
कारंजा हे कोरोनाचे बाबतीत हॉटस्पॉट बनत आहे. रुग्ण संख्या १९ पोहोचली असून एका जणाचा मृत्यू झाल्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे झाले असून नागरिकांनी शक्य त्या सर्व काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
प्रशासन हे आपले जिव मुठीत घेऊन कार्य करीत असून नागरिकांनी गर्दी न करणे, मास्क लावणे, अंतर राखणे, शासनाचे वेळोवेळी दिलेले निर्देश पाळावे असे आवाहन तहसिलदार यांनी केले आहे.