वाशिम जिल्ह्यात 8 वर्षीय बालका सह एकाचा अहवाल पाझेटिवह

  वाशिम जिल्ह्यात 8 वर्षीय बालका सह एकाचा अहवाल  पोझेटिव्ह


          कारंजा : ( जिमाका) दि ९


           रात्री उशिरा प्राप्त झालेल्या १९ अहवालांपैकी २ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत. यापैकी एक व्यक्ती बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील असून तो कोरोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे.


       तर दूसरा मुंबई येथून पोहरादेवी (ता. मानोरा) येथे आलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षीय बालकाचा अहवालही 'पॉझिटिव्ह' आला आहे. त्याच्या वडिलांचा अहवाल कालच निगेटिव्ह आला होता, तर आईचा अहवाल प्रतीक्षेत आहे. मुंबई येथून पोहरादेवी येथे आल्यानंतर सदर कुटुंबाला  संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले होते. पोहरादेवी येथे येण्यापूर्वी सदर कुटुंब नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. याबाबतची माहिती प्राप्त झाल्याने त्यांच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 


 आता या नंतर जिल्ह्यात एकूण कोरोना बधितांची संख्या कारंजा तालुक्यातील दादगाव, तर मानोरा तालुक्यातील भोयनी, व पोहरादेवी तर वाशिम तालुक्यात2 असे एकूण  5 वर आली आहे