दुर्गा माता संस्थान पोहा येथे रक्तदान शिबिर संपन्न कांता देवी डाळे ब्लड बँक वाशिम द्वारा रक्त संकलन     एकूण 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 दुर्गा माता संस्थान पोहा येथे रक्तदान शिबिर संपन्न कांता देवी डाळे ब्लड बँक वाशिम द्वारा रक्त संकलन 


       एकूण 75 रक्तदात्यांनी केले रक्तदान


     कारंजा -- ( कारंजा वृत्तकेसरी)


         कोरोनाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामीण भागाच्या ठिकाणी रक्तदान केले.हे दात्यांची जागरूक कर्तव्यबुद्धी दर्शविते.  शिवाय सर्व शेतकरी बंधूनी सुद्धा आपली शेतीची कामे पार पाडून रक्तदान शिबिरास प्रतिसाद नोंदविला.


           आपली सामाजिक बांधीलकी सांभाळत धीरज मांजरे साहेब (तहसीलदार),कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाशदादा डहाके,आशिष दहातोंडे(जि.प सदस्य),डॉ.शरदराव दहातोंडे (सरपंच),अशोकराव दहातोंडे(अध्यक्ष संस्थान),हरणे साहेब(नायब तहसीलदार),सुनीलभाऊ गुल्हाने (सिविल इंजी),डॉ.सुशीलभाऊ देशपांडे,आशिषदादा बंड, किशोरभाऊ धाकतोड, प्रज्वल गुलालकरी,कौस्तुभदादा डहाके,कालिदास तापी(डेप्युटी मुख्याधिकारी), किरणताई जाधव(T.M.O)* या मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह दुगुणीत केला.शिबिरा करिता गावातील तरुण पिढीने पुढे येऊन मोलाचे योगदान दिले.महामारीच्या संकटकाळी गावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झाल्यामुळे गावातील तरुण पिढीवर प्रौढ जनतेची शाबासकीची थापआहे.