मोठी बातमी
कोरोना चा वाढता कहर पाहता कारंजातील सर्व व्यापारी संघटनानी "व्यापारी जनता कर्फ्यू " 24 तारखे पर्यन्त वाढविला
22 ते 24 तारखे पर्यन्त किराना दुकान राहणार सकाळी 9 ते 2 वजेपर्यंत खुली
प्रशासनाचे लाभणार पूर्ण सहकार्य
कारंजा:(संदीप क़ुर्हे)दि 21
संपूर्ण कारंजा शहरात कोरोना वाढता प्रभाव पाहता जनता भयभीत झाल्याचे चित्र आहे धक्यावर धक्के देत कोरोना ने शहरात चांगलेच पाय रोवले आहेत तालुक्यासह कारंजात संपर्कातील रुग्ण वाढत आहेत
कोरोनाची वाढती दहशत पाहता कारंजातील सूजनशील व्यापारी संगटनेने पूर्ण कारंजा बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले आहे 4 दिवस जनता कर्फ्यू असूनही वाढते रुग्ण पाहुन किराना,सराफा, कापड जनरल स्टोर्स, तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यानी पुन्हा 3 दिवसांनी हा सुरु असलेल्या व्यापारी जनता कर्फ़्यू वाढविन्याच निर्णय घेतला आहे
या कर्फ्यू मध्ये मात्र नागरिकांची गैर सोय होउ नये म्हणून किराणा दुकाने सकाळी 9 ते 2 सुरु राहणार आहे
"कारंजात दिवसागणिक करोना रुग्णांत गुणात्मक वाढ होतच आहे. रोज नवीन नवीन एरियात रुग्ण आढळत आहेत. याला कारण म्हणजे फक्त जनसंपर्क आहे. तो कुठल्याही माध्यमातून का होईना पण बधितांच्या संपर्कात आल्यामुळे करोना वाढल्याचे दिसत आहे परिणामी हा कर्फ्यू
पुढे 3 दिवस वाढवित असल्याचे आकाश कर्है यांनी कारंजा वृत्तकेसरी शी बोलताना दिली