कारंजात पुन्हा 3 पोझेटिव्ह
2 माळीपूरा व 1 भीमनगर
व्यापारी जनता कर्फ्यू चा दूसरा दिवसही कडकडित बंद
कारंजा :( कारंजा वृत्तकेसरी)दि 19
कारंजा शहरामध्ये कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच कारंजेकरानी व स्थानीक सर्व व्यापारी संघटनेने एकत्रित येवून कोरोनाचाच पराभव करण्याचे ठरविले आणि सर्व व्यापारी मंडळीनी नागरिकांच्या सहकार्याने पूर्ण ४ दिवसाचा व्यापारी जनता कर्फ्यू लागू करण्याची हिम्मत केली याची फलश्रुती म्हणून व्यापारी एकता आज शहरात दुसऱ्यां दिवसी सुद्धा पाहण्यासाठी मिळत आहे व्यापारी मंडळणी केलेल्या आवाहनाची दखल कारंजावासियांनी चांगलीच मनापासून घेतलेली दुसऱ्या दिवशीही पाहण्यास मिळाली व व्यापारी जनता कर्फ्यु च्या १००% कडकडीत बंद यशश्वी करुण दाखवून दिला . दुकाने बंद आहे. जनता व व्यापारी कोरोना ची साखळी तोडण्याकरिता सज्ज असून शहरात आज दुसऱ्या दिवशीही बजारपेठेत शुकशुकाट पाहन्यास मिळत होता
कारंजात आज 3 रुग्ण पोझेटिव्ह आढळून आले
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार कारंजा लाड येथील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये माळीपुरा, कारंजा लाड येथील १० व ११ वर्षीय मुलांचा समावेश आहे. ही दोन्ही मुले यापूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील आहेत.
भीमनगर, कारंजा लाड येथील एका २३ वर्षीय युवकाचा कोरोना विषयक अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सदर युवक अकोला येथे मृत्यू पावलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आला होता. सद्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयात या पूर्वी 11 कोरोना बाधितावर उपचार सुरु आहेत