कारंजात 15 दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा-- महेश राऊत प्रहार जनशक्ति संघटना

कारंजातील कोरोना ची स्थिती पाहता शहरात जनता कर्फ्यू लावा--- महेश राऊत प्रहार जनशक्ति


 


कारंजा: (प्रतिनिधी)दि 15


       कारंजातील कोरोना ची स्थिती पाहता शहरात जनता कर्फ्यू लावण्यात यावा अशी मागणी चे निवेदन प्रहार जनशक्ति संगठना चे ता अद्यक्ष महेश राऊत यांनी तहसीलदार कारंजा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे 


           प्रहार ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित रुग्णाचे वाढते प्रमाण असल्यामुळे शहरात व तालुक्यात भीती दायक वातावरण निर्माण झाले असून कारंजातील प्रशासकीय यंत्रणेवर कार्य करत असतांना ताण येऊ नये, कारंजा तालुक्याची लोकसंख्या विचारात घेता कोरोंना रुग्णाची संख्या आटोक्यात आणण्याकरिता तसेच कारंजा शहर व तालुका भय मुक्त राहावा, म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने कारंजा शहरांमध्ये पंधरा दिवस जनता कर्फ्यू लावण्यात यावा व 15 दिवसीय कडकडीत जनता कर्फ्यूच पालन व्हावं अत्यावश्यक सेवा वगळता सर्वे दुकाने 100 टक्के बंद करण्यात यावे. निवेदनावर संघटनेच्यास अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत