सायंकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये नव्याने 15 रुग्णाचा समावेश , नागरिकांसह जिल्ह्या प्रशासन हादरले

सायंकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये नव्याने 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसह जिल्ह्या प्रशासन हादरले  


जिल्हावासियांसाठी चिंताजनक व धक्कादायक बाब


रिसोड शहर व तालुका.     02


मालेगाव तालुका.             0 4


वाशिम                                                  10


 कारंजा।                           02


एकूण  रुग्ण                     42


एक्टिव रुग्ण ।                  34


 


कारंजा:(रामदास मिसाळ) दि १२


पोर्ट आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाशिम शहराच्या निमजगा परिसरातील 10 रुग्णांचा समावेश आहे.तसेच रिसोड तालुक्यात पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील एकता नगरमध्ये दिल्ली वरून आलेला 41 वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील कन्हेरी इथं आलेली 60 वर्षीय महिला असे २ रुग्ण पॉझिटिव्ह आली आहे.


         मालेगांव तालुक्यातील खेर्डा इथं आलेली 31 वर्षीय महिला तसेच डोंगर किन्ही येथील 28 वर्षीय पुरुष आणि 23 वर्षीय महिला हे दोघे पती पत्नी असे ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.


जिल्ह्यात शुक्रवार सायंकाळ पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ४२झाली असून यातील 6 रुग्णांना सुटी देण्यात आली तर दोघांचा मृत्यू झाला आहे.


सद्यस्थितीत ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


    शिवाय आज दुपारी अमरावती जिल्ह्यातील आलेल्या कोरोना विषयक चाचणीचे अहवालात कारंजा येथील गांधी चौक परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.    


 कालच रेस्ट हाऊस परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर ही शहरातील दुसरी पॉझिटिव्ह केस असून शहरातील नागरिकांत यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कारंजात सुद्धा सद्या स्थितीत २ रुग्ण आढळून आल्याने कारंजेकरामध्ये भीती चे वातावरण झाल्याचे दिसत आहे