कोरोना चा वाढता कहर पाहता कारंजातील सर्व व्यापारी संघटना स्वयंस्फुर्तीने पाळणार ४ दिवसीय व्यापारी जनता कर्फ्यू

कोरोना चा वाढता कहर पाहता कारंजातील सर्व व्यापारी संघटना स्वयंस्फुर्तीने पाळणार ४ दिवसीय व्यापारी जनता कर्फ्यू 


प्रशासनाचे लाभणार पूर्ण सहकार्य


 



  1. १८ ते २१ जून दरम्यान पाळणार जनता कर्फ्यू


 


कारंजा:  (संदीप क़ुर्हे)दि १७


   संपूर्ण कारंजा शहरात कोरोना वाढता प्रभाव पाहता जनता भयभीत झाल्याचे चित्र आहे धक्यावर धक्के देत कोरोना ने शहरात चांगलेच पाय रोवले आहेत तालुक्यासह कारंजात आज २२ रुग्ण ओषधोपचार घेत आहेत शिवाय बरेच शे टेस्टिंग नमूने प्रलंबित आहेत 


  कोरोनाची वाढती दहशत पाहता कारंजातील सूजनशील व्यापारी संगटनेने पूर्ण कारंजा बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाला सहकार्या करण्याचे निवेदन तहसीलदार कारंजा यांना दिले आहे निवेदनात १८ ते २१ जून पर्यन्त सर्व प्रतिष्ठानें बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे निवेदनात किराना,सराफा, कापड जनरल स्टोर्स, तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी च्या सह्या आहेत 


                     "कारंजात दिवसागणिक करोना रुग्णांत गुणात्मक वाढ होतच आहे. रोज नवीन नवीन एरियात रुग्ण आढळत आहेत. याला कारण म्हणजे फक्त जनसंपर्क आहे. तो कुठल्याही माध्यमातून का होईना पण बधितांच्या संपर्कात आल्यामुळे करोना हा वाढणारच. आता या स्थितीला असा कुठलाच उपाय, माहिती व सूचना राहिल्या नाहीत की ज्या करोना संदर्भात दिल्या गेल्या नाहीत किंवा कुणी वाचल्या नसतील. सर्व गोष्टींचा परिपाक फक्त एकच येतो, संपर्क टाळा म्हणजेच घरी रहा, सुरक्षित रहा, काळजीपूर्वक रहा. जेंव्हा ह्या गोष्टी स्वतःहून समजत नाही तेंव्हा मात्र शासन प्रशासनाला या बाबत सर्वांना जागृत करावे लागते. सक्ती करावी लागते , शासन करावे लागते. पण इतके करूनही आज तीन महिन्यानंतर परिस्थिती जैसे थेच दिसत आहे. उलट लोकं जास्त निष्काळजी दिसत आहेत. आज अनेक कारणांनी बाहेर पडून स्वतःचा जीव धोक्यात घालीत आहेत. पण अश्यामुळे स्वतःसोबतच दुसऱ्यांच्या जीवसुद्धा धोक्यात टाकत आहेत. अश्यावेळी मात्र काही निर्णय हे स्वतःलाच घ्यावे लागतात. आज काही व्यापारी संघटनांनी घेतलेला निर्णय खरोखरच अभिनंदनिय आहे. ह्या निर्णयाने जरी थोडी लोकांची गैरसोय होईल तरी त्यांच्या व स्वतः व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे करणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांना कधी बंद नसतो, ते त्यांची सर्व्हिस अविरत देत असतात. पण जेंव्हा जीवन मरणाचा प्रश्न येतो तेंव्हा मात्र असा कठोर निर्णय घ्यावाच लागतो. आजचा बंद चा निर्णय घेऊन सर्व व्यापाऱ्यांनी आपला व्यवसायिक तोटा सहन करून जो हातभार शासनाला लावला तो अत्यन्त सामाजिक व कौतुकास्पद आहे. मेडिसिन व्यवसाय हा तातडीचा व्यवसाय असून तो कायद्याने बंद करता येत नाही. मी माझ्या सर्व केमिस्ट बंधूंचे आभार व्यक्त करून अभिमान बाळगतो की या अश्या कठीण प्रसंगी सर्व आपला जीव धोक्यात टाकून आपली सामाजिक सेवा देत आहेत. त्याची आज समजला अत्यंत आवश्यकता सुद्धा आहे. आम्हाला जरी बंद करता येत नाही तरी आमचा सर्व व्यापारी संघटनांच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा आहे. 


कारंजातील करोना बाधा अधिक विदारक न होवो यासाठी आपण सर्वानी झटायचे आहे. काळजी घ्यावयाची आहे. शासन प्रशासनाला मदत करायची आहे. वैयक्तिक, सामाजिक, संघटना पातळीवर जशी होईल तसे सर्वानी सहकार्य करावे""


      आशीष बंड(जैन)


       आशीष मेडिकल


     अद्यक्ष,केमिस्ट संघटना


        कारंजा