तो मृत झालेला ट्रक  ड्रायव्हर नसून ट्रक क्लिनर निघाला कोरोनाग्रस्त मृतक जिल्हा बाहेरिल असल्याने अद्यापही जिल्हा कोरोना मुक्तच

तो मृत झालेला ट्रक  ड्रायव्हर नसून ट्रक क्लिनर निघाला कोरोनाग्रस्त
मृतक जिल्हा बाहेरिल असल्याने अद्यापही जिल्हा कोरोना मुक्तच
 मृतकाच्या संपर्कातील  व्यक्तींचे केले गेले टेस्ट : रिपोर्ट येणे बाकी 


 वाशिम (कारंजा वृत्तकेसरी) दि.०४


    दि. १ मे रोजी वाशिम जिल्ह्याचे हद्दीतून मुंबई मार्गे नागपूरला जाणार्‍या एका ट्रक चे क्लिनरला क्ष्वसनाचा त्रास होत होता, तसेच त्याला तापही होता त्यामुळे त्याला २ मे रोजी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचदिवशी उपचारा दरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे घशातील स्त्रावाचे नमुने हे चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली होते, हे निश्‍चित झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने देण्यात आलेली आहे. 
 अहवाल प्राप्ती नंतर त्याचे संपर्कात आल्या व्यक्तींना आयसोलेशनल कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांचे स्वॅब हे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तरी
अद्याप पर्यंत वाशिम जिल्हा हा कोरोनामुक्तच आहे
     वाशिम सामान्य रुग्णालयाने पाठविलेले ह्या स्वॅब चे निकाल जरी पॉझिटिव्ह आले असले तरी सदरहू ट्रक हा जिल्हा हद्दीतून जात होता, त्याचा सरळ-सरळ वाशिम जिल्ह्याशी संबंध नसल्याने अद्यापतरी वाशिम जिल्हा हा कोरोनामुक्तच आहे.