यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा वाशिम जिल्ह्यात शिरकाव
कारंजातिल डॉ कांत हॉस्पिटल मध्ये तपासणी करून गेलेला रुग्ण निघाला कोरोना ‘पॉझिटीव्ह’
संपर्कातील एका डॉक्टरसह ८ जण वाशिम येथे तपासणीला पाठविण्यात आले
कारंजा (कारंजा वृत्तकेसरी)दि ७ में
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील कोरोना रुग्णाने कारंजात शिरकाव केल्याने जिल्ह्यातील प्रशासनाच्या भूवया उचावल्या आहे
हकीकत अशी की नेर तालुक्यातील मधूमेह आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण ४ मे रोजी कारंजातील एका खासगी रुग्णालयात नियमित तपासणी करून गेला. आता या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे ६ मे रोजी त्याच्या थ्रोट स्वॅब तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे या रुग्णाची तपासणी करणाºया एका डॉक्टरसह रुग्णालयातील तसेच लॅब व सोनोग्राफी सेंटरमधील मिळून ८ जणांना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांचे थ्रोट स्वॅब अहवाल तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील मधूमेह आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण ४ मे रोजी कारंजा येथे आपल्या नियमित तपासणीसाठी आला होता. या रुग्णाची तपासणी संबंधित डॉक्टर आणि त्याच्या सहकायांनी केली. या रुग्णाला श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून त्याचा थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. या थ्रोट स्वॅबचा अहवाल ६ मे रोजी प्राप्त झाला. त्यात संबंधित रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. कारंजात या रुग्णाची तपासणी करणाºया संबंधित डॉक्टरसह त्याची पत्नी व रुग्णालयातील २ सहकारी, एक रक्त तपासणी प्रयोशाळा तंत्रज्ञ १ व त्याचा सहकारी, एक सोनोग्राफी तंत्रज्ञ असे ८ जण त्या रुग्णाच्या संपर्कात आले असल्याने या सर्वांना तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या सर्वांचे थ्रोट स्वॅब अहवाल तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात ४ मे रोजी आणखी किती व्यक्ती आले. याबाबत आरोग्य, महसुल व पोलीस विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र तो रुग्ण कारंजातील कुणाचा संपर्कात आला त्यांचा शोध घेणे सुरु आहे
ग्रामीण पोलिसांच्या ‘चेकपोस्ट’ वर प्रश्नचिन्ह
कोरोना विषाणू नियंत्रणासाठी जिल्हाप्रशासनाने जिल्हा बंदी केली असतानाही यवतमाळ येथील रुग्णाला ग्रामीण पोलिसांनी चेकपोस्टवरून कारंजा तालुक्यात प्रवेश दिला. त्यामुळे तालुक्यात कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून नेर तालुक्यातून येणाºया नागरिकांना ‘चेकपोस्ट’वर चौकशी न करताच कारंजा तालुक्यात सोडल्याबद्दल संबंधित चेकपोस्टवरील कर्मचारी बद्दल शहर
वासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे