कारंजा वासियांची  धक धक वाढली , कारंजातील ७ जणांचे स्वॅबचे निकाल उद्या संध्याकाळ पर्यंत येणार असल्याने  शहर वासियांची चिंता राहणार कायम.

कारंजा वासियांची  धक धक वाढली


कारंजातील ७ जणांचे स्वॅबचे निकाल उद्या संध्याकाळ पर्यंत येणार असल्याने  शहर वासियांची चिंता राहणार कायम.


नेर येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे संपर्कातील कारंजाचे ७ 


  कारंजा (कारंजा वृत्तकेसरी) दि.०७ -


     आज रोजी एकुण १२ जणांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले असून यांत कारंजा येथील ७ जणांचा तर त्या मृतक क्लिनरचे संपर्कातील ५ जणांचा समावेश आहे. ह्या सर्वांचे घशाच्या स्त्रावाचे नमुने पाठविले असून त्यांचा निकाल हा उद्या संध्याकाळ पर्यंत येणे अभिप्रेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ.अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे. परिणामी कारंजातील ७ जणांचे स्वॅबचे निकाल उद्या संध्याकाळ पर्यंत येणार असल्याने  शहर वासियांची चिंता राहणार कायम राहणार आहे.


         काल दि. ०६ मे रोजी यवतमाळ येथे नेर येथील एका रुग्णाचे निकाल हे पॉझिटिव्ह आले होते. या रुग्णाने दिनांक ०४ मे रोजी कारंजा येथील  दवाखान्यात तपासणी करवून घेतली होती. यावेळी त्या रुग्णाची रक्त तपासणी करण्यात आली होती तसेच एक्सरे ही काढण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी साठी डॉक्टर, त्यांची पत्नी, २ सहकारी, पॅथोलॉजीचे संचालक, सोनोग्राफी सेंटर चे संचालक व सहाय्यक असे ७ जणांना आयसोलेशन मध्ये ठेवले असून त्यांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
 तर दुसरीकडे दिनांक २ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत झालेल्या ट्रक क्लिनरचे संपर्कातील ५ जणांचे घशाचे स्त्रावही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 
 या ह्या सर्वजणांचे रिपोर्ट काय येते याकडे जनतेचे लक्ष्य लागले असून कारंजा व वाशिम शहरात थोडी चिंता वाढली आहे. तरी या सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह यावेत, अशी आशा व प्रार्थना जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत. 
 दरम्यान, आज प्राप्त माहितीनुसार एकुण १०४ पेशंटची नोंद असून, यांतील ६७ हे गृह विलगीकरणात (Home Quarantine), ३० संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quarantine) तर १२ हे अलगीकरणात (Isolation) ठेवण्यात आलेले आहेत. आजपावेतो ६८ लोकांचे घशाचे स्त्राव नमुने घेण्यात आले असून यांतील ५४ हे निगेटीव्ह आहेत, २ पॉझिटीव्ह असून यांतील एकाचा मृत्यू झाला असून एक इसम पुर्णपणे बरा होऊन घरी गेला आहेकारंजा ७ व वाशिम चे ५ असे ऐकून १२ जणांचे रिपोर्ट हे उद्या संध्याकाळ पर्यंत येण्याची शक्यता  असल्याने ८ एप्रिल च्या संध्याकाळ पर्यन्त तरी टेंसन कायम राहणार आहे