कारंजातील नागरिकांनी केला आनंदोउत्सव साजरा
कारंजातील तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी सह रुग्णाच्या नातेवाईक या सर्वांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
वाशिम ( कारंजा वृत्तकेसरी ) दि.10
काल दिनांक 9 रोजी कारंजा येथील डॉक्टर व त्यांचे सहकारी सह नेर येथील शिक्षक रुग्णाचे नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व रिपोर्ट आज रोजी निगेटिव्ह आल्यामुळे संपूर्ण कारंजा शहरातील अनंदोउत्सव साजरा केला आहे गावभरात उत्सवी वातावरण पसरले आहे. तसेच एकूण 13 ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संपूर्ण वाशिम जिल्हा ने अजूनही ग्रिन झोन मध्येच आपले स्थान टिकवून ठेवले आहे
सर्व लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह यावेत यासाठी कारंजातील सर्व धर्मीय बांधवांनी देवांना जणू साकडे घातले होते.
शेवटी कारंजाचे दैवत नुर्षिह स्वरस्वती गुरु महाराजांचे आशीर्वाद च सर्वांचे कामी आले सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने कारंजासह संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.