कारंजेकरांचे टेंशन पुन्हा लांबणीवर--पण गुरु मावली च्या आधारवड़ साथ देणार
कोरोना बाधीत शिक्षकाचे संपर्कातील कारंजातील डॉक्टर सह 8 व कोरोना बाधित रुग्णाच्या परिवारातील 4 व इतर 1 चे घशांचे स्त्रावाचे नमुने शनीवारी तपासणीसाठी पाठविणार -- डॉ.सोनटक्के जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम
वाशिम (कारंजा वृत्तकेसरी ग्रुप ) दि.08 में
- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील शिक्षक रुग्णाची तपासणी करणार्या कारंजा येथील तज्ञ डॉक्टर व त्यांचे सहकारी 7 असे ऐकून 8 जणांचे व नेर येथील बाधित शिक्षकाच्या कारंजातील परिवारातील 4 सदस्य असे एकूण 13 जणांचे घशांचे स्त्रावाचे नमुने हे उद्या म्हणजे शनीवार दि.9 मे रोजी तपासणीसाठी पाठविण्यात येणार
असून त्याचा तपासणी अहवाल शनिवार पासुन 24 किवा 36 तासात येण्याची असल्याने
तो पर्यंत मात्र कारंजेकर मात्र जीव मुठीत घेवून बसणार आहेत
4 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एका शिक्षकाचे चेकअप कारंजातील तज्ञ डॉक्टर नी केले होते परंतु सदर पेशंट सर्व चेकअप रिपोर्ट वर डाक्टराणा शंका आल्याने त्याला लगेच यवतमाळ येथे रेफर केले होते यवतमाळ येथे तपासणीत तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे 6 मे रोजीचे यवतमाळ येथे निष्पन्न झाले होते. त्यामुळे 6 मे रोजीच त्या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर व त्यांचे संपर्कातील इतर 7 असे 8 जणांना वाशिम येथे नेण्यात आले होते. तसेच या शिक्षक रुग्णाचे नातेसंबंधातील 4 लोकांना सुद्धा वाशिम येथे नेण्यात आले होते.
कोरोना रुग्णाचे संपर्कात आल्या नंतर संपर्कातील व्यक्तीचे स्वॅबचे नुमने हे 5-6दिवसांनी तपासणी साठी पाठविले जाते. नेर येेथील त्या शिक्षकाचा उपचार कारंजा येथे 4 मे रोजी करण्यात आला होता. त्यानुसार उद्या शनीवार दि. 9 मे रोजी सहावा दिवस असून डॉक्टरांचे सह 7, शिक्षकाचे परिवारातील काही सदस्य असे एकूण 13 जणांचे घशांचे स्त्रावाचे नमुने हे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येतील.व त्याांचा तपासणी अहवाल हा त्या पुढील 24 ते 36 तासात येवू शकणार आहे
"तो" ट्रक ड्राइवर निघाला कोरोना पॉझिटिव्ह
2 मे रोजी मृत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह क्लिनरचे संपर्कातील ट्रकचा ड्रायव्हर, व मालेगांव मेहकर मार्गावरील अक्षय पेट्रोल पंप वरील 5 जण, इतर 4असे एकूण 9 जणांचे व सारा ह्या रोगाचे 3असे एकुण 12 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 11 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असून ट्रक ड्रायव्हरचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मा.श्री.हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.