बी बियाने व खते शेतकऱ्यांच्या बांधावर"कारंजा तालुका कृषी विभागा च्या आवाहनाला शेतकऱ्यांच्या उस्फूर्त प्रतिसाद

"बी बियाने व खते शेतकऱ्यांच्या बांधावर"कारंजा तालुका कृषी विभागा च्या आवाहनाला शेतकऱ्यांच्या उस्फूर्त प्रतिसाद


कारंजा (तालुका प्रतिनिधी)दी १ मे


     कोरोना संकट काळात कास्तकारांना कोणतीही अड़चन निर्माण होउ नये म्हणून सरकार कडून विविध योजना आखल्या जात आहेत अशाच काही योजना शासनांच्या कृषी विभाग तर्फे  तालका कृषी अधिकारी यांच्या मार्फत राबविल्या जात आहेत सद्या पेरणीचा हंगाम सुरु होत आहे कोरोना संचारबन्दी च्या काळात कास्तकारांना लागणाऱ्या बी बियाने खते  ही सरळ त्यांना गावात शेतात त्याना मिळावे म्हणून कास्तकरानी खाली दिलेल्या लिंक वर आपली नोंदणी करावी जेने करुण त्याना लागणार साहित्य बियाने घर पोहोच दिल्या जाइल  असे आवाहन तालुका कृषि अधिकारी संतोष वाळके यांनी केले आहे तसेच कृषी अधिकारी यांचेवतीने सर्व शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षो नवीन बॅग चे बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही, मागच्या वर्षीचे सोयाबीन उगवण शक्ती तपासून पेरता येते, उगवण शक्ती 70 टक्के असल्यास 30 किलो बियाणे एकरी वापरावे व 65 टक्के उगवण असल्यास 35 किलो बियाणे एकरी वापरावे, उगवण शक्ती कशी तपासावी याबाबत आपल्या गावात आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी मित्र तसेच प्रगतशील शेतकरी यांच्याद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम खरीप हंगामपूर्वी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. उगवण शक्ती तपासण्याबाबतअडचण/ शंका असल्यास आपल्या गावातील *कृषी सहायक* यांच्याशी संपर्क साधा. आपल्या गावातील *कृषी सहायक* याच्याशी सम्पर्क होत नसल्यास या लिंक 
https://forms.gle/SEWcDucHbspx1LEbA 
द्वारा संपर्क साधा. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी बाजरात येण्याचे टाळा, आपणास लागणाऱ्या बियाणे, खताची मागणी खालील लिंक वर करा *https://forms.gle/C4JJXf4cfc2CFeyw8* 
वर नोंदविल्यास आपणास  घरपोच बियाणे व खते रास्त दरा मध्ये आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रा मार्फत पोहचविल्या जातील. खते व बियाणे ची मागणी कशी करावी यासाठी कृषी सहायक, कृषी मित्र, प्रगतशील शेतकरी यांची मदत घ्यावी. असेही कॄषि विभागा तर्फे करण्यात आले आहे.


   "बी बियाने व खते शेतकऱ्यांच्या बांधावर" या आवाहनाला कास्तकरानी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ४५० कास्तकरानी on line मालाची मागणी केली असून त्यांना घरपोहोच मालाचा पुरवठा सुद्धा केला आहे तसेच विक्रेता जी क़ीमत आखत आहे त्यावर सुद्धा आमचे नियंत्रण आहे कुणाचीही लुबाडनुक होणार नाही या कड़े आमचे पूर्ण लक्ष्य आहे------संतोष वाळके तालुका कृषी अधिकारी कारंजा