कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत अंगणवाडी सेविका

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत अंगणवाडी सेविका


तुटपुंज्या व अनियमित वेतनावर कुठल्याही प्रकारे आढेवेढे न घेता काम करणारे अंगणवाडी ताईची होत आहे जिल्हाभर प्रशंसा


वाशिम दि.१३:(प्रतिनिधी)-


     एकीकडे कोविड 19 विषाणुशी सर्व आरोग्य यंत्रणा लढा देत असतांना दुसरीकडे एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या वाशिम ग्रामीण अंतर्गत  170 अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भविष्यातील सदृढ पिढी निर्माण होऊन बलशाली भारतासाठीआघाडीवर राहून लढा देत आहेत. प्रत्येक गरोदर माता, स्तनदा माता व बालकास परिपूर्ण पोषण आहार मिळावे यासाठी उन्हातान्हात शेत शिवार व वाड्यापाड्यापासून ते गल्लीबोळातील प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सुरक्षितपणे काम करीत आहेत. देशात बालमृत्यू कुपोषण ही गंभीर समस्या आहे. संपूर्ण देशात लाखो मृत्यू फक्त पोषण आहाराच्या कमतरतेमुळे देशाची सर्व आरोग्य यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र लढा देत आहे. असे असताना गरोदर माता स्तनदा माता व शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यांच्या पोषण आहार वितरणात लॉकडाऊनमूळे अडचण येऊ नये व प्रत्येक लाभार्थ्यांना घरपोच पोषण आहार मिळावे यासाठी शासनाचे एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस अविरत परिश्रम घेत आहेत. एकीकडे आरोग्य कर्मचारी स्वछता कर्मचारी व पोलीस आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचा मुकाबला करता असतांना दुसरीकडे या महामारीतही देशात सदृढ बालक व आरोग्यदायी माता निर्माण व्हाव्यात यासाठी कसलीही तमा न बागळता शेती, वाडी, गाव शिवारातील प्रत्येक मुख्य लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण वाटप करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍याचे काम हे ही तितकेच तोलामोलाची असून तुटपुंज्या व अनियमित वेतनावर कुठल्याही प्रकारे आढेवेढे न घेता काम करणारे अंगणवाडी ताईचा लढा नक्कीच वाशिम जिल्हयासाठी स्वागतार्ह आहे.


----------------
      "एकात्मिक बालविकास प्रकल्प वाशीम ग्रामीण अंतर्गत 170 अंगणवाडी असून, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील 6779 बालकांना आणि 3 ते 6 वर्षे वयोगटातील 8144 बालकांना सध्या घरपोच आहार देण्याचं काम सुरळीतपणे चालू आहे. तसेच 102 व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून घरगुती अनौपचारिक शिक्षण आपण देत आहोत. सगळे कर्मचारी, सेविका, मदतनिस, चांगल्या प्रकारे काम करत असून वाशीम ग्रीन झोनमध्ये असण्यामध्ये यांचा ही मोलाचा वाटा आहे. लवकरच आपण सगळे कोरोना विषाणू सारख्या या महामारीच्या संकटातून बाहेर पडू."
                     कु. प्रियांका हरिश्चंद्र गवळी
                    एकात्मिक बालविकास प्रकल्प                                   अधिकारी, वाशीम