कवठल ता मंगरुळपीर मधील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील राहलेले 7 रिपोर्ट निगेटिव्ह  आता एकही शिल्लक नाही जिल्ह्यातील वर्ध्याच्या कोरोना बाधित रुग्णाचे संपर्कातील सर्व संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह

वाशिम जिल्ह्या साठी आनंदाची बातमी


कवठल ता मंगरुळपीर मधील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील राहलेले 7 रिपोर्ट निगेटिव्ह 


आता एकही शिल्लक नाही


जिल्ह्यातील वर्ध्याच्या कोरोना बाधित रुग्णाचे संपर्कातील सर्व संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह


कारंजा (कारंजा वृत) दि 14 में


         सावंगी-वर्धा येथे उपचार घेत असलेल्या कवठळ (ता. मंगरुळपीर) येथील रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील ७ व्यक्ती व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले 'सारी'चे दोन रुग्ण असे एकूण ९ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने १२ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व 'निगेटिव्ह' आहेत. आता एकही अहवाल प्रलंबित नसल्याने वाशिम जिल्ह्या साठी ही आनंदाची बातमी आहे.


       आतापर्यंत एकूण ९७ स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९४ अहवाल 'निगेटिव्ह' तर ०३ अहवाल 'पॉझिटिव्ह' आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या तीन व्यक्तींपैकी एका व्यक्तीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे.