कारंजात कोरोना संकट टळल्या चा आंनद साजरा होत असतानाच पुन्हा कोरोना संकटाची दहशत कायम
वर्धा येथील कोरोना बाधित पेशंट कारंजातील एका हॉस्पिटल मध्ये होता 4 दिवस भरती
कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी) दि 10 में
आजच कारंजातील तज्ञ डॉक्टर व त्यांच्या सहकारी तथा नेर येथील बाधित शिक्षका च्या 4 नातेवाईक यांचे घश्याचे नमूने निगेटिव्ह आले होते परिणामी शहरात आनंद गगनात मावेनाशा झाला असतानाच एक नवीन बातमी येवून ठेपली ती अशी की वर्धा येथे वाशिम जिल्ह्यातील कवठल ता मंगरुलपीर मधील रुग्ण हा कोरोना बाधित निघाला या रुग्णाचा इतिहास पाहता मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम कवठळ येथील रुग्नाला आज वर्धा येथे कोरोना झाल्याचे प्राप्त अहवालावरून सिद्ध झाले. मात्र तो कारंजातील खाजगी रुग्णालयात 30 एप्रिल ते 4 मे पर्यत भरती होता. त्या मुळे कारंजातील खाजगी डॉक्टर व 3 सहकार्यांना वाशिम येथे तपासणी करिता पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील आजारी रुग्ण कारंजातील खाजगी रुग्णालयात 30 एप्रिल ते 4 मे पर्यत भरती होता मात्र त्याची तब्येत जास्त झाल्यामुळे डॉ ने त्या पेशंट ला अकोला येथे रेफर केले नंतर अकोला वरून त्यांना वर्धा येथे पाठविण्यात आले. मात्र दि 10 मे रोजी त्याला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे कारंजातील ज्या रुग्णालयात तो भरती होता त्या रुग्णालयाती एक डॉक्टर व 3 सहकार्यांना दि. 10 मे रोजी रात्री उशिरा वाशिम येथे पाठवण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. तसेच कारंजा तील दोन नियमित रुग्ण कारंजा उप जिल्हा रुग्णालयात नियमित तपासणी साठी गेले असता त्यांना लक्षणे आढल्यामुळे त्यांना सुुधा कोणतीही रिस्क नको म्हणून तपासणी करिता वाशिम येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे
यामध्ये 4 पुरुष व 1 महिला असल्याचे वृत्त आहे त्यामुळे पुन्हा कारंजेकराचे संकट वाढले असून या 5 जणांचा रिपोर्ट येईपर्यत कारंजेकराणा प्रतीक्षा करावी लागेल.