दुसऱ्यांदा आलेले कोरोना संकट अखेर टळले
कारंजातील डॉक्टर व सहकाऱ्यांचे सर्व रिपोर्ट "निगेटीव"
कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी) दि 13 में
वर्धा येथे उपचार घेत असलेल्या कवठळ (ता. मंगरुळपीर) येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कारंजा लाड येथील डॉक्टरसह पाच व्यक्ती आणि वाशिम तालुक्यातील पाचंबा व व कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण ७ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने ११ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व 'निगेटिव्ह' असल्याची माहिती जिल्हा प्रशासना कडून दिल्या गेली आहे
१२ मे रोजी पाठविलेल्या ९ स्त्राव नमुन्यांचे तपासणी अहवाल अप्राप्त असून या मध्ये वर्धा येथील पेशंट च्या संपर्कातील 7 जणांचा सहभाग असून हे रिपोर्ट आज संध्याकाळी येण्याची शक्यता आहे दरम्यान वर्धा येथील 64 वर्षीय रुग्ण हा पक्षघात, हदयरोग,सह आता कोरोना बाधित असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थीर असून त्याला कोरोनाचे एकही लक्षण दिसत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे हया रुग्णाच्या तापसनारे वर्धा येथील डॉक्टर व सहकारी त्यांचा मुलगा व पत्नी यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजले.
दरम्यान कारंजातील डॉक्टर व सहकारी व यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कारंजेकरानी पुन्हा सुटकेचा श्वास सोडला आहे