अकोल्यातील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या  कारंजाचा व्यक्ती हा मागील 15 मार्च पासुन कारंजात आलाच नाही ,त्यामुळे कारंजेकरांनी घाबरण्याचे कारण नसून अफवा वर लक्ष्य देवू नये--प्रशासना चे आवाहन

अकोल्यातील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या  कारंजाचा व्यक्ती हा मागील 15 मार्च पासुन कारंजात आलाच नाही ,त्यामुळे कारंजेकरांनी घाबरण्याचे कारण नसून अफवा वर लक्ष्य देवू नये--प्रशासना चे आवाहन


 कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी )दि 9 मे


           - अकोला येथे आज सायंकाळी मिळालेल्या काही पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक व्यक्ती ही कारंजाची असल्याची बातमी शोसल मीडिया द्वारे प्रत्येकाच्या व्हाट्सअप वर आली आणि कारंजेकरांणा एक धक्का देवून गेली मात्र   कोणीही कोणत्याही प्रकारची सहनिशा न करताच ही बातमी व्हायरल करत गेले  परंतु  सत्य हकीकत अशी की, अकोला येथे कोरोना पॉसिटीव्ह आढळलेले 40 वर्षीय रुग्ण हे कारंजा येथील रहिवासी आहे व ते शिक्षक आहेत. नगर परिषद तसेच महसूल प्रशासनाच्या वतीने सविस्तर माहिती घेण्याचे प्रयत्न केला असता तो   


शिक्षक दि. 15 मार्च 2020 पासून कारंजा येथे आलाच नाही तो मागील दोन वर्षांपासून ते सासरवाडी मध्येच राहायला गेले होते.त्यामुळे  त्यांचा कारंजातील नगरिकांचा व त्यांचा कारंजातील परिवार सद्यस्य  चा कशाही प्रकारचा कॉन्टेक्ट आलेला नाही  त्या मुळे कारंजा वासियांनी  घाबरण्याची गरज नाही,मात्र दक्षता घ्यावी. घरातच राहा, सुरक्षित राहा,प्रशासनाला सहकार्य करावे


      ह्या संदर्भात त्या इसमाचे कारंजातील नातेवाईक व संबंधीतांसह बाहेरुनही माहिती घेण्यात आली असून ते लॉकडाऊन पुर्वी पासून ती व्यक्ती कारंजात आली नसल्याची माहिती असून आणखीन सखोल तपास प्रशासन करीत आहे.  तरी कारंजातील नागरिकांनी संबंधीत व्यक्ती कारंजात आलेलाच नसल्याने खुप काही घाबरण्याचे किंवा अफवा उडविण्याचे कारण नाही. असेेेही प्रशासना तर्फे सांगण्यात आले
     कारंजा आजही सुरक्षीत आहे, आणि भविष्यातही सुरक्षीतच राहील. फक्त नागरिकांनी संयमाने रहावे व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अफवा पसरवू नका, अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे, हे ही लक्ष्यात ठेवावे.