नर्मदेश्वर शिक्षक सह पत संस्था तर्फे कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून 11 हजाराचा मदत निधीचा धनादेश सहकार विभागाला सुपुर्द.

श्री नर्मदेश्वर शिक्षक सह पत संस्था तर्फे कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून 11 हजाराचा मदत निधीचा धनादेश सहकार विभागाला सुपुर्द.


 कारंजा- ( कारंजा वृत्तकेसरी) दि 12 में


       कोरोना हया संसर्गजन्य रोगाचे संकट काळात संपूर्ण भारत देश या अदॄश्य बीमारी सोबतच आर्थिक संकटाचा सामना करीत असताना विविध सामाजिक संघटना,दानशूर दाते,विविध संस्था,बैंका,पत संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत  पंतप्रधान ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सहकार विभाग,आदिनी आर्थिक संकटाचा सामना करनेकरिता मदतीचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत  स्थानिक  श्री नर्मदेश्वर शिक्षक सह पत संस्था धामणी या पतसंस्थेचे अध्यक्ष विजय भड व सचिव संतोष कुटे  यांचे तर्फे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 11 हजार रु. मदत निधीचा धनादेश स्थानिक सहायक निबंधक यांना सुपुर्द करुन सामाजिक बाधीलकी जपत कोरोनाच्या लढाई एक प्रकार मदत केली आहे.