पालघर जिल्ह्यात झालेली संत हत्याला जबाबदार आरोपी यांना फाशी देने आणि अनंत करमुसे यांना मारहाण करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्री मंडळातून बडतर्फ करन्याची बजरंग दल व शिवप्रतिष्ठान ची निवेदना द्वारे मागणी

पालघर जिल्ह्यात झालेली संत हत्याला जबाबदार आरोपी यांना फाशी देने आणि अनंत करमुसे यांना मारहाण करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्री मंडळातून बडतर्फ करन्याची बजरंग दल व शिवप्रतिष्ठान ची निवेदना द्वारे मागणी


कारंजा:  ( कारंजा वृत्तकेसरी) दी 25 एप्रिल


     पालघर जिल्हयात दि१६ एप्रिल रोजी श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे संत श्री कल्पवृक्षगिरी महाराज
आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक निलेश यांची हिसक
जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घुण हत्या केली आहे. यासंदर्भात समोर
आलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसच त्या वयोवृद्ध संताना हिंसक जमावाकडे सोपवत असल्याचे
आणि पोलिसांच्या समोरच त्याची निघृण हत्या होत असल्याचे भीषण वास्तव उघड झाले आहे. 
या घटनेला जबाबदार व घटनास्थळी उपस्थित पोलीसचे कर्मचाऱ्याकडे साधुनी संरक्षणाची याचना केली.
असताना त्यांना वाचविन्याचा कोणताही प्रयत्न न करणाऱ्या पोलीस कर्मचारयांना या प्रकरणात आरोपी
करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. जर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी
असणारा पोलीसच हत्या करणारयांना साहाय्य करत असेल, तर जनतेने कोणाच्या भरवशावर रहावे? या
आधीही 5 एप्रिल ला ठाणे येथे पोलिसांनी श्री.अनंत करमुसे नामक एका हिंदुत्ववादयाला त्याच्या घरातून
उचलून नेऊन जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांच्या बंगल्यावर बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली होती.
तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानाने उंचावलेली पोलीसदलाची मान अशा घटनांमुळे कलंकित होऊन
खाली जात आहे. संतांची भूमी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या घटना आहेत.
वारंवार हिंदूना लक्ष्य करणा-या या हिंसक घटना रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई
करण्याची आवश्यकता आहे. पालघर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणा-या
हिंसक जमावासोबत संबधित पोलिसांवरही ३०२ चा गुन्हा नोंद करावा, तसेच दोषी पोलिसांना
सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी आमची मागनी आहे. सरकारने याविषयीची नेमकी
माहिती जनतेला द्यायला हवी लॉकडाऊनच्या काळात दळणवळण बंदी काळात पालघर येथे शेकडो
लोकाचा जमाव रात्रीच्या वेळी जमून लाठी-काठ्यासह बाहेर येतो काय आणि संत पोलिसांकडे
संरक्षणाची विनंती करत असतांना त्यांची निघृण हत्या करतो. हे हादरवून टाकणारे दृश्य आहे.
श्री पंचदशनाम जुना आखाडा हा देशातील १३ आखाड्यांपैकी सर्वात मोठा आखाडा आहे.
त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
त्यामुळे सरकारने या संत हत्या प्रकरणी दोषींना फाशी द्यावी आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांची
मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांना एका तरुणाच्या  हत्येचा प्रयत्न केला या गुन्ह्याखाली त्वरीत अटक करावी या निवेेेदना द्वारे
मा.पंतप्रधान कार्यालय, भारत सरकार,मा.गृहमंत्री भारत सरकार,मा.मुखमंत्री, महाराष्ट्र सरकार,
मा.गृहमंत्री, महाराष्ट्र सरकार मागणी केली आहे