लॉक डाऊन' मध्ये जिल्ह्यातील सर्व मस्जिद मध्ये अज़ान देण्याची परवानगी देण्यात यावी- मो.युसूफ पुंजानी

 


 


'लॉक डाऊन' मध्ये जिल्ह्यातील सर्व मस्जिद मध्ये अज़ान देण्याची परवानगी देण्यात यावी- मो.युसूफ पुंजानी


कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी ) 


मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना दि.२५ एप्रिल २०२० पासून  सुरू होणार आहे. रमजान महिन्याला आमच्या इस्लाम धर्मात अधिक महत्व आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मस्जिद मध्ये पाच वेळ अजान देण्याची परवानगी देण्यात यावी.अशी मागणी मो.युसूफ पुंजानी यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
       निवेदनामध्ये नमूद केले आहे की,मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना दि.२५ एप्रिल २०२० पासून  सुरू होणार आहे. रमजान महिन्याला इस्लाम धर्मात अधिक महत्व आहे.तरी जिल्ह्यातील सर्व मस्जिद मध्ये पाच वेळ अजान देण्याची परवानगी देण्यात यावी. जेने करून उपवास ठेवायला व उपवास सोडायला मस्जिद द्वारे सुचित करण्यात सोईस्कर होईल. पुर्ण भारत देश कोरोना महामारी संकटातून झटत आहे. याची मला पूर्णपणे जाणीव आहे.भारत सरकारने तथा महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सूचनेचे आम्ही लोकांनी पुर्णपणे पालन केलेले आहे.या पुढेही आमच्या समाजाचे सहकार्य लाभेल. तसेच आमच्या या विनंती अर्जाचा विचार करून योग्य तो न्याय द्यावा.अशी मागणी पुंजानी यांनी केली आहे.निवेदनाची प्रतिलिपी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे.