डॉ खोतकर कोरोना संकटातही निभावतात आपली  सामाजिक बांधीलकी

 


डॉ खोतकर कोरोना संकटातही  निभावतात आपली  सामाजिक बांधीलकी


कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी) दी १५ एप्रिल      कोरोना च्या संकटात कारंजातील जवळपास काही अपवादात्मक वगळता सर्वच दवाखाने सुरु आहेत काहीनच्या सेवा हया अविरत सुरु आहेत त्यामध्ये आर्थोपेडिक डॉक्टर्स सुधा आपली सेवा अविरत देत आहेत त्यापैकी डॉ नीलेश खोतकर हे एक आहेत पेशंट आपल्या क्लीनिक ला असो की नसो डॉ खोतकर हे आपल्या क्लीनिक ला सकाळ संध्याकाळ नेहमी उपस्थित राहून सेवा देतात मंगळवार बंद  राहत असल्याने मंगळवार वगळता ते नेहमी उपस्थित राहत असुन रूग्ण सेवा करीत असतात काल त्यांनी आपला क्लीनिक ला सूटी असतानाही सासप्रमुख श्याम सवाई यांच्या एका फोन वर पेशंट ची परिस्थिती पाहता आपले क्लीनिक उघडून एका निराधार महिलेवर ओषधोपचार केला घटना अशी की संत रविदास नगर मधील एका निराधार महिला श्रीमती रामप्यारीबाई अहिरवार वय अंदाजे 45 ही 2 - 3 महिन्यापासुन घरातच पायाला झालेल्या जखमे मुळे त्रस्त होती मागे पुढे कोणीही नसल्याने हातावरची उत्पन्न असल्याने तिने पोटाला खावे की पायाला झालेल्या जखमेवर उपचारा करिता खर्च करावा या विचाराने तिने जखमे कड़े दुर्लक्ष करुण पोटाची खळगी कसी भरावी या विचाराने जखम दुर्लक्षीत केली  लॉकडाउन असल्याने परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते मुकेश रायदास यांचे  महिलेकड़े अचानक लक्ष्य गेल्याने जखम दिसली तेव्हा या जखमाच्या वेदना तीला सहन होत नव्हत्या परिणामी रायदास यांनी सास प्रमुख श्याम सवाई यांना फोन करुण उपचाराची विंनंती केली त्यांनी लगेच डॉ खोतकर यांना पेशंट ची स्थिती सांगितली क्लीनिक ला सूटी असतानाही डॉक्टर नी विनाविलंब  त्या महिले च्या जखमें ची स्थिती अत्यंत बिकट असतानाही तिच्यावर उपचार केलेत या याकामी विजय कोषटवारसह सर्व स्टाफ  नी गोपी अहिरवार रवि अहिरवार, केतन धनगोल आदिनी मदत केली