घरी राहूनच म.फुले यांची जयंती घराघरात साजरी


घरात राहण्याचा संदेश देत म.फुले जयंती घराघरात साजरी    


कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी ) दि ११ एप्रिल                      भारतीय स्त्री शिक्षणाचे आद्यप्रवर्तक,तथा शिवजयंतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची   जयंती कारंजा शहरात कोरोना पासून बचाव करण्याचा संदेश देत घरारात साजरी करण्यात आली.       सध्या गेल्या 24 तारखेपासून संपूर्ण देश लॉकडाउन आहे,कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात होत असून त्यापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशच घरात राहून कोरोनासोबत लढत आहे.


शिवाय सरकारने सुद्धा सर्वच धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली होती यामुळे यावर्षी 11 एप्रिल चा  क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचा सामूहिक अभिवादनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता ,तसेच आपापल्या घरीच जयंती साजरी करण्याचे आवाहन वाशीम जिल्हा माळी कर्मचारी सेवा मंडळाकडून करण्यात आले होते.फुलेंप्रेमींनी आपापल्या घरी जयंती साजरी केली व शुभेच्छा दिल्या.