सर फाउंडेशन च्या जिल्हा समन्वयकपदी गोपाल खाडे ,विजयकुमार रौराळे, व निता तोडकर या तीन शिक्षकाची  नियुक्ती जाहीर.

सर फाउंडेशन च्या जिल्हा समन्वयकपदी गोपाल खाडे ,विजयकुमार रौराळे, व निता तोडकर या तीन शिक्षकाची  नियुक्ती जाहीर.


कारंजा : ( कारंजा वृत्तकेसरी) १५ एप्रिल २०


         उपक्रमशील सर्जनशील तंत्रस्नेही व वेगवेगळे प्रयोग राबवणाऱ्या शिक्षकांचे देशपातळीवरील हक्काचे व्यासपीठ म्हणून महत्त्वपूर्ण असलेल्या सर फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक यांच्या जिल्हानिहाय निवड यादी राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ , राज्य समन्वयक राष्ट्रीय आदर्श शिक्षक सिद्धाराम माशाळे, महिला राज्य समन्वयक हेमाताई शिंदे , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप गुंड, राजकिरण चव्हाण यांनी दिनांक१४ एप्रिल २०२० घोषित केली.प्रयोगशील शिक्षक गोपाल खाडे, विजयकुमार रौराळे ,व निता तोडकर ,यांनी सातत्याने शैक्षणिक सामाजिक साहित्य समाजसेवा क्षेत्रात राज्यभर उभारलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची सर फाउंडेशन च्या वाशीम जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती केली आहे.
गोपाल खाडे हे जि.प.विद्यालय कामरगांव येथे शिक्षक पदावर कार्यरत असुन राष्ट्रिय इनोन्हेशन पुरस्कारप्राप्त शिक्षक आहे.विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मान करण्यासाठी ते विज्ञान प्रदर्शनी व विज्ञान जत्रेचे आयोजन करतात.चिमणी व पक्षी वाचविण्यासंदर्भात फार मोठे काम त्यांच्या मार्गदर्शनात चालते.राज्यस्तरावर स्तरावर २००६ पासुन सतत विद्यालयाच्या विद्यार्थ्याना सहभागी करुन घेण्यात त्यांची मेहनत आहे.नीता तोडकर राज्य इनोव्हेशन प्राप्त शिक्षिका असुन पर्यावरण क्षेत्रात उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे.गावाचा इतिहास,झाड नावाची गोष्ट, रानभाजी खाद्यमहोत्सव हे त्यांचे विशेष उपक्रम आहेत.विद्यार्थ्यांनी कथा कविता लिहाव्यात यासाठी त्या विशेष मेहनत घेतात.विजयकुमार रौराळे हे जि.प.प्राथमिक शाळा टाकळी बु येथे कार्यरत असुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विविध उपक्रम राबवितात.राज्य,विभागस्तरावर त्यांनी तज्ज्ञ म्हणुन काम पाहले आहे.तंबाखुमुक्त शाळा अभियान,
मूल्यवर्धन शाळा अभियान व शाळाबाहय विद्यार्थाना व स्थंलांतरित विद्यार्थाना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासंदर्भात त्यांचे फार मोठे योगदान आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यपाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे कडुन इयत्ता पहिली पाठयपुस्तकनिर्मिती करिता राज्य पातळीवर त्यांनी काम पाहीले आहे.उपक्रमशिल अशा
गोपाल खाडे विजयकुमार रौराळे व निता तोडकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाभरातुन सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.येत्या शैक्षणिक सत्रापासुन  जिल्हा गुणवत्तेसाठी सर फौंडेशन कटिबद्ध राहणार असल्याचे मनोगत तिघांनी व्यक्त केले.