जैन धर्मियांचे चोविसावे तीर्थकर जगत शांतीदूत भगवान महावीर यांच्या जयंती निमित्य.............


जवळपास २५०० वर्षापूर्वी म्हणजे इ.स. पूर्व ५९९ वर्ष कुंडलग्राम येथे राजा सिद्धार्थ व माता त्रिशला यांना जे वीर पुत्र झाले ते म्हणजे *वीर , अतिवीर , वर्धमान , सन्मति या नावांनी परिचित असलेले भगवान महावीर* जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर वर्तमान शासन नायक. केवळ ३० वर्ष अशा युवा अवस्थेत राज वैभवाचा त्याग करून मानवजातीच्या कल्याणार्थ अखंड १२ वर्षे खडतर तप, साधना केली आणि एक दिव्य ज्ञान , केवल ज्ञान प्राप्त केल्यानंतर जगतामधील अखिल मानव जातीसाठी उपदेश केला. *पंचशील तत्वा-* च्या साह्याने मनुष्याचे जीवन सरळ केले. *अंहिसा, अपरिग्रह,असत्य, अचौर्य आणि ब्रम्हचर्य* , ज्यांनी *जिओ और जिने दो* हया सूत्रातून सर्वोदयी असे आणि काळ , वेळ, स्थळ, जात यांच्या सीमेच्या पलीकडे जावून मानवजातीला अदभूत असा सिध्दांत दिला .
आज *अनिश्चिततेच्या आणि अस्वस्थेतेच्या* वातावरणात भगवान महावीरांचा उपदेश खूप महत्वपूर्ण आहे.
२५०० वर्षानंतरही भगवान महावीरांचे नामस्मरण तेवढयाच श्रद्धेने आणि भक्तीने जगभर केले जाते त्याचे मूळ कारण म्हणजेच त्यांनी पूर्ण जगतातील अखिल मानवजातीला दाखविलेला *सरळ आणि सोपा पण शाश्वत आणि आत्मिक सुखाची* प्राप्ती करून देणारा मार्ग होय.
आज *चैत्र शुक्ल त्रयोदशी , ६ एप्रिल २०२० भगवान महावीरांचा जन्मोत्सव* अखिल मानव जातीला अंधारमय वातावरणातून प्रकाश दाखविणाऱ्या 
*भगवान महावीरांना* त्रिवार वंदन...🙏🙏


 


रामदास विट्ठलराव मिसाळ


कारंजा 9765363015 / 8999909204