समाजकार्य चे शिक्षण घेणाऱ्या अश्विनीने स्वखर्चने स्वता मास्क तयार करुण नागरिकांना पुरविले मोफत
वाशिम( परम मुसले) दी 23 एप्रिल
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे बी.एस.डब्ल्यु.भाग 1 मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी कु. अश्विनी गांवडे हीने आपल्या आईच्या सहकार्याने आपल्या गांवातील ग्रामस्थाना स्वतः कपड्याचे मास्क तयार करून वाटप केले आहे
संकट काळात कोरोना हा आजार
संसर्गजन्य असून मास्क ला किती महत्व आहे आनी गावातील काही लोक मास्कचा वापर करत नाहीत आणी काही रूमालाचा उपयोग करत आहेत हे लक्षात येता समाजकार्याचे प्रशिक्षण घेणारी अश्विनी च्या लक्षात आले व तीने आपले गांव शेलु बु.येथे आईच्या सहकार्याने स्वतः मास्क तयार करुन ग्रामस्ताना वाटप केले व वापरण्यासंबधी महत्व पटवुन देेेउन जनजागृती केली.