संचारबंदी चे महत्व समजा अन्यथा कारवाही ला सामोरे जा --- जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी


           कारंजा दि.५ -


            कोरोना ह्या रोगाची गंभीरता अजूनही काही लोकांच्या लक्ष्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. ८ ते १२ ही वेळ केवळ व व केवळ ज्याला कोणाला काही जीवनावश्यक वस्तू आणावयाच्या आहेत केवळ व केवळ त्यांचेसाठीच आहे. कोणीही बाहेर यावे व फिरावे यासाठी ही वेळ दिलेली नाही. तरी ह्या रोगाची गंभीरता समजून घरीच थांबा व संचारबंदी आदेशाचे पालन करा असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे. 
         एका विडीओ चित्रफितच्या माध्यमाने त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना हा संदेश दिला आहे. आतापावेतो विनाकारण प्रशासनावर ताण वाढविणार्‍यांचे विरोधात एकुण २६३ केसेस करण्यात आले असून ५० पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली आहेत. कोर्टाच्या आदेशा शिवाय कोणतेही वाहन हे देण्यात येणार नाही, असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे. 
         तरी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 


पहा पो अ वसंत परदेशी साहेब यांचे वीडियो आवाहन