ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक वाघमोडे व त्यांच्या सहकार्या कडून पत्रकाराला अमानुष मारहाण
कारंजा लाड (कारंजा वृत्तकेसरी ) दि. 21
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाउन आहे. नागरिकाची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी 8 ते 12 पर्यत शेतकरी व नागरिकांसाठी शिथिलता दिली असताना सुद्धा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस उप निरीक्षक वाघमोडे व पोलीस शिपाई नितीन ठाकरे व सतोष इंगळे यांनी शहर पोलिस स्टेशन च्या हद्दित जेष्ठ पत्रकार तथा शेतकरी सुधीर देशपांडे हे फवारणी साहित्य शेतात घेऊन जात असताना दि 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान एम एस सी बी च्या पॉवर हाउस जवळ काही कारण नसताना दुचाकी थांबवून अमानुष पणे मारहाण केल्याचाप्रकार घडला
पत्रकार सुधीर देशपांडे वय 55 हे व पुतण्या शेतात टरबूज असल्याने फवारणी साहित्य घेऊन जात असताना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक वाघमाडे व शीपाई नितीन ठाकरे, सतोष इंगळे यांनी पत्रकारच आय कार्ड तसेच मास असतांना सुद्धा तुम्हा फिरता असे धम्मकीने बोलून मारण्यास सुरवात केली. त्यामुळे देशपांडे यांच्या पाटीवर व पायावर काठीचे ओळ आहेत. वास्तविक पाहता ही घटना ज्या ठिकाणी घडली ती हद्द ग्रामीण पोलिसांची नसून शहर पोलिसांची आहे .या घटनेचा कारंजातील सर्व पत्रकार बांधवांनी ग्रामीण पोलिसांचा निषेध नोंदवून त्या अधिकारी व कर्मचाऱ्या विरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार व शहर व ग्रांमीन चे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संजय पाटील व तहसीलदार धीरज मांजरे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये येऊन घटनेची माहिती जाणून घेतली संबंधित अधिकारी व कर्मचार्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले.
पोलिसांन सोबतच ज्याना नागरिकावर दंडुके दाखविन्याचा अधिकार नाही असे होमगार्ड सुद्धा नागरिकावर आपला धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत यावेळी कारंजातील समस्त दैनिक व साप्ताहिक तसेच न्यूज चॅनल चे प्रतिनिधी सह सर्वच पत्रकार बांधवांची तसेच ग्रामीण भागातील पत्रकाराची
उपस्थिती होती.