ग्रामीण पत्रकार संघाची पत्रकात सुधीर देशपांडे यांचेवरिल खोटे गुन्हे मागे घेवून ग्रामीण च्या थानेदाराची बदली करण्याची तहसिलदारांना दिलेल्या निवेेेदनातून मागणी

ग्रामीण पत्रकार संघाची पत्रकार सुधीर देशपांडे यांचेवरिल खोटे गुन्हे मागे घेवून ग्रामीण च्या थानेदाराची बदली करण्याची तहसिलदारांना दिलेल्या निवेेेदनातून मागणी



  कारंजा:(ललित तिवारी )दि 23 एप्रिल


      गेल्या महिनाभर्‍यापासून देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने 3 में पर्यंत लाॅकडाऊन घोषित केले आहे. लाॅकडाऊनच्या या काळात सकाळी 8 ते 12 या वेळेत नागरिकांना जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी सुट देण्यात आली आहे. परंतु याचवेळी शेतात शेतीउपयोगी साहित्य घेऊन जाणार्‍या शेतकरी तथा पत्रकार देशपांडे यांना कारंजा गा्रमीण पोलीसांनी 21 एप्रिल रोजी बेदम मारहाण केली. शिवाय देशपांडे विरूध्द खोटी तक्रार दाखल करून तसेच  घटनास्थळ बदलून त्यांच्यावर शासकिय कामात अडथळा आणण्यासारखा गंभीर गुन्हा दाखल केला. शिवाय त्यांना सरईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली. पत्रकार देशपांडे यांना पोलीसांनी केलेल्या मारहाणीचा कारंजा तालुका गा्रमीण पत्रकार संघाने निषेध केला असून देशपांडे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, दोषी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावे तसेच ठाणेदार इंगळे यांची तात्काळी बदली करावी अशी मागणी 23 एप्रिल रोजी कारंजा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून गा्रमीण पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. निवेदनानुसार कारंजा गा्रमीण पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे व शिपाई नितीन ठाकरे आणि संतोष इंगळे या तिघांनी पत्रकार सुधीर देशपांडे हे आपल्या शेतात शेतीउपयोगी साहित्य घेऊन जात असतांना विनाकारण त्यांची दुचाकी अडवुन आरेरावी केली. तसेच देशपांडे यांच्यासह त्यांच्या पुतण्याला अमानुष मारहाण केली. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर कारंजा दारव्हा मार्गावरील वीजकेद्राजवळ सदर घटना घडली असून देखील पंचनाम्यादरम्यान कामठवाडा पलिकडचे घटनास्थळ दाखवून देशपांडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. सदर प्रकरणी देशपांडे यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवरून दोषी पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे व शिपाई नितीन ठाकरे आणि संतोष इंगळे यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करावे, पत्रकार देशपांडे यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत. तसेच कांरजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी बी इंगळे यांची त्वरीत बदली करावी अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात गा्रमीण पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा गर्भित इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी ग्रामीन पञकार संघाचे  जिल्हा अध्यक्ष अशोकराव उपाध्ये  महाराष्ट राज्य मराठी पञकार संघ जिल्हा अध्यक्ष वाशीम सुनिल फुलारी  पञकार संघाचे  तालुका अध्यक्ष अंकुश कडु  धनराज उटवाल ,नरेद्र बोरकर  ,सय्यद अब्रल , बहुजन पञकार संघाचे तालुका अध्यक्ष आरीफ पोपटे  पवन कदम  धनजय राठोड जिनवर तायडे अंकुश कथे सतोष घुले विजय धाळवे उलास ठाकरे  ए एस शेक  महादेव काठोळे  विजय भड  आदी पञकाराची मोठ्या प्रमानात उपस्थिती होती