क्रांतिसूर्य.............

..क्रांतिसूर्य........                  


 विद्येविना मती गेली,मतिविना नीती गेली,नीतिविना गती गेली,गतिविना वित्त गेले ,वित्ताविना शुद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले. ह्या ओळी माहीत नाही असा व्यक्ती क्वचितच सापडेल.आज शूद्रांनी विद्या घेतली,विद्येमुळे त्यांची मती(बुध्दी),नीती(कौशल्य) सुधारली,त्यांना गतीही(रोजगार)प्राप्त झाले,त्यांचाकडे वित्तही आले आणि क्रित्येक पिढ्यानपिढ्या ज्यांच्या छाताडावर ही जुन्या रूढी परंपरा यांची भुते आपल्या पंज्यांची नखे परजित बसली होती.तिच्याच छाताडावर थयथया नाचत संविधानाने त्यांचे हातच कलम करून टाकले.हे कुणामुळे तर असे एकगुरुशिष्य,की ज्यांनी कधी एकमेकांना पाहिलेही नाही,पाहणं तर सोडा कधी त्यांची भेटही झाली नाही एवढेच कशाला त्यांचा जन्मही वेगवेगळ्या काळातला.हो बरोबर आधुनिक भारताचे जनक,राष्ट्रपिता क्रांतिसूर्य म. जोतीराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर हेच ते गुरुशिष्य होत.आपली माडी,गाडी आणि सर्वकाही हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आज 11 एप्रिल म.जोतीराव फुले यांची जयंती तर 14 एप्रिल ला डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.हा एप्रिल महिना भारतीय उपखंडात फार उष्ण असतो पण या एप्रिल महिन्यातंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा संदेश देणारे दोन नररत्न जन्माला आले आणि या भारतातील समस्त बहुजनांना उपकृत करून गेले.तुमच्या ऋणातुन मुक्त होण्याची शक्ती आमच्या क्रित्येक पिढ्याना सुद्धा येणार नाही.विनम्र अभिवादन !


🙏🏼🙏🏼हेमंत साहेबराव पापळे,कारंजा(लाड),जिल्हा वाशीम 9422762278