कारंजा ( कारंजा वृत्तकेसरी )
माळी कर्मचारी सेवा मंडळ,अखिल भारतीय माळी महासंघ,माळी युवा संघ,माळी युवा मंच,सामाजिक समता प्रबोधन मंच कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कारंजा शहरात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येत असतो.मात्र लॉकडाउन तसेच संचारबंदी मुळे यावर्षीचा 11 एप्रिल 2020 चा
अभिवादन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वानी आपापल्या घरीच राहावे तसेच यावर्षी सर्वानी आपल्या घरीच जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करावी असे आवाहन वाशीम जिल्हा माळी कर्मचारी सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, कारंजा तालुकाध्यक्ष मधुकरराव इंगळे,सचिव परमेश्वर व्यवहारे,उपाध्यक्ष योगेश्वर शामसुंदर,सत्यजित गाडगे,विवेक जिचकार,विवेक साबळे,शशी वेळूकार,विजय भड,राजेंद्र शामसुंदर,महेंद्र धनस्कर, अजय राऊत हेमंत पापळे कारंजा यांनी केले आहे.