कारंजा लाड येथील पत्रकार सुधीर देशपांडे मारहाण प्रकरणात गृह राज्यमंत्र्यांनी घेतली दखल
कारंजा :(संदीप क़ुर्हे) दी 22 एप्रिल
पुण्यनगरी वृत्तपत्राचे पत्रकार सुधीर देशपांडे यांना व त्यांच्या पुतण्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीसंदर्भात मी स्वतः राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई आणि पोलीस अधिक्षक श्री.परदेशी यांच्याशी संपर्क साधला आणि देशपांडे यांना मारहाण करणार्या मुजोर पोलिस अधिकार्याला तात्काळ बडतर्फ करा अशी वाशिम जिल्ह्यातील पत्रकारांनी मागणी केली आहे, ती मान्य करा असे सांगितले. यावर देसाईसाहेब म्हणाले, सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता संबंधित अधिकार्याला तात्काळ बडतर्फ करता येणार नाही त्यांची कन्ट्रोल रूममध्ये बदली करतो असे सांगून १५ मिनिटांतच बदली केली.ते पुढे असेही म्हणाले की, ३ मे रोजी लाॅकडाऊन उठल्यानंतर संबंधित पोलिस अधिकार्याच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आणून द्या मी पोलिस आयजींमार्फत चौकशी
करण्याचे आदेश देतो, असे गृह राज्यमंत्री देसाईसाहेबांनी आश्वासन दिले आहे.
मराठी पत्रकार परिकषद चे विश्वस्थ कीरण नाईक म्हणाले कीदेशपांडे मारहाणी प्रकरणात जिल्हाध्यक्ष माधव अंभोरे स्वतः लक्ष घालत आहेत व माझ्या संपर्कातही आहेत.आपण सर्वांनी संघटीत होऊन देशपांडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या.वाशिम जिल्हा पत्रकारांच्या सोबत मराठी पत्रकार परिषद ताकदीनिशी सज्ज आहे.