कोरोना ला रोखण्या करीता कारंजा शहरातील वसाहतींचा पुढाकार

कोरोना ला रोखण्या करीता कारंजा शहरातील वसाहतींचा पुढाकार


  कारंजा (ललित तिवारी) दि. 29 एप्रिल


  वाढत्या कोरोना चा संभाव्य धोका ओळखून  शहरातील वसाहती कोरोना ला रोखण्या करिता स्वतःउन पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहेत कोहिनूर कॉलोनी,यशोदा नगर,मनोरा रोड पसरणी रोड येथील मुख्य रस्ता कॉलनी वासीयांनी बंद केला आहे .प्रशासनास सहकार्य करण्याचा प्रयत्न म्हणून वाढत्या कोरोनाचा धोका पाहून कारंजा मधील कोहिनूर कॉलनी  वासीयांनी कॉलनी सील केली आहे. या रस्त्याने दिवसरात्र  मंगरूळ मनोरा येथील वाहने मोठ्या संखेने येजा करत होते कारण पुढे प्रेसिडेंट हॉटेल जवळ चेक पोस्ट असल्यामुळे वाहनधारक या रस्त्याने शहरात प्रवेश करत होते तसेच गावातील फेरीवाले सुद्धा बिनदिक्कत पणे फिरत होते यामुळे प्रशानसला मदत म्हणून सर्व कोहिनूर कॉलनी नागरिकांनी एक आदर्श शहरा मध्ये निर्माण केला नगरातील मंडळीनी अत्यावश्यक  वस्तू  साठी  घरातील  1 व्यक्ती जाऊन अत्यावश्यक सामान आणेल असा निर्धार केला आहे. तसेच कोणत्याही मित्राला किंवा नातेवाईक तसेच अनोळखी व्यक्ती कॉलनी मध्ये येणास बंदी घालण्यात आली आहे. तरी असा एक आदर्श सोशल डिस्टन्स ठेऊन आपली जबाबदारी पार पाडत आहे तसेच शिस्तीचे पालन करत आहे.