कोरोना युद्धात कारंजातील योद्धा डॉ.कल्याणी पिंपळे
कारंजा (किशोर धाकतोड़ सर ) दि 24 एप्रिल
कारंजा लाड जि:-वाशीम येथील प्रा.श्री.राजेश्वर आप्पा पिंपळे यांची कन्या डॉ.कु.कल्याणी राजेश्वर आप्पा पिंपळे. MBBS ...सध्या जगजीवन राम रेल्वे हाँस्पीटल मुंबई मध्य. येथे सेकंडरी DNB करित आहे. हाहाकार माजविणार्या कोरोना मुळे देश लॉकडाउऊन केला आहे,आणी घरात रहा-सुरक्षित रहा हा संदेश दिल्या जात आहे,आपण मात्र त्याला त्याला गार्भीयाने घेतलेले दिसत नाही अजुनही काही ऊपद्रवी बाहेर पडतातच*
या कोरोनाच्या जैवीक युद्धात बायपास कारंजा शहरातील डॉ.कल्याणी पिंपळे यांची जगजीवन राम रेल्वे हॉस्पीटल,मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची काळजी घेण्या साठी नेमणुक केलेली आहे*
त्या हॉस्पिटलमध्ये कोवीडचे 19 रुग्ण एक आठवडा होते आता तर तेथे 54 झाले आहेत ,डॉ.कु.कल्याणी पिपळे यांनी एक आठवडा ड्यूटी नंतर त्यांना स्थानिक प्रशासनाने 14 दिवस क्वारंटाईन मध्ये पाठवले होते
आणी त्याऩंतर परत त्या तिथेच रुग्णांची सेवा करत आहे सद्यस्थितीत 90 कोरोना ग्रस्त गंभीर रुग्णांची काळजी घ्यावी लागत आहे. त्याच्या सेवेला जिव्हाळ्याचा प्रणाम!