पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उद्या देशाला संबोधीत करणार, ‘रेड-ऑरेंज-ग्रीन’ झोननुसार लॉकडाऊन ची करणार घोषणा
दिल्ली : ( कारंजा वृत्तकेसरी ग्रुप ) दी १३ एप्रिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. 14 एप्रिल) म्हणजेच मंगळवारी सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च रोजी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत उद्या म्हणजेच 14 एप्रिलला संपत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला संबोधित करणार असून ते लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा, ओडिशा आणि दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर 5 राज्यातील मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशातील लॉकडाऊन वाढविण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, देशातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन केले आहेत. जानकाराकडूंन त्यामध्ये किमान रेड आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन कमी जास्त करण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे