भ महावीर जयंती निमित्य सर्व सार्वजनीक कार्यक्रम रद्द करुण गरजवंताना तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत अन्नधान्य वाटप

 


कारंजा लाड ( कारंजा वृत्तकेसरी ग्रुप )दि ६ एप्रिल


      संपूर्ण जगाला जगा आणि जगु दया हा संदेश तसेच शांति व अहिंसेची शिकवण देणारे जैन धमीॅयांचे 24 वे तिंर्थकर भगवान महावीर हयांची जयंती हया वर्षी 6 एप्रिल रोजी साधारण पद्धति ने साजरी करण्याचे भगवान महावीर जयंती महोत्सव समिति ने सर्व समाजबांधवांना आवाहन केले होते . त्यानुसार समाजबांधवांनी आपल्या घरी भगवंतांचा अभिषेक,  आराधना , स्तृती सामायिक पुजा अर्चा व आरती करुन अत्यंत साध्या पद्धतीने महावीर जयंती साजरी केली. सध्या देशात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे  हा संर्सगजन्य आजार असल्यामुळे त्याचा वेळीच प्रार्दुभाव रोखने अत्यंत आवश्यक आहे . महाराष्टातही हया रोगाने आपले हातपाय पसरायला सुरवात केली असुन सामाजिक कर्तव्य वा कारंजा लाड शहराची सुरक्षितता लक्षात घेता तसेच माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे जी व आरोग्य मंत्री आदरणीय राजेश टोपे जी हयांच्या आवाहनानुसार हयावर्षी महावीर जयंती निमित्त निघणारी प्रभातफेरी , शोभायात्रा , मोटारसायकल रॅली व महाप्रसाद आदी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्या चे भगवान महावीर जयंती महोत्सव समिति चे अध्यक्ष नितिन बुरसे सचिव अॅड. संदेश जिंतुरकर व कोषाध्यक्ष धनंजय राउळ हयांनी सांगितले
    दरवर्षी कारंजा लाड शहरात महावीर चौक स्थित गुरु देवेन्द्र किर्ती सभागृह येथे भगवान महावीर जयंती मोठया प्रमाणावर साजरी केली जाते . हयानिमित्ताने सकाळी प्रभातफेरी , सायंकाळी विशाल शोभायात्रा , भव्य मोटारसायकल रॅली तसेच भगवान महावीर स्वामींचा जन्माभिषेक सोहळा हयाच बरोबर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानमालेचे आयोजन होत असते हयानिमीत्ताने शहरातील जैन समाज मोठयाप्रमाणात एकत्र येऊन महावीरांची शिकवण जगाला दिलेला संदेश हयाचा प्रचार प्रसार करत महावीरांचा जय जयकार करत आपल्या एकात्मते च दर्शन घडवितात . परंतु हयावर्षी कोरोना व्हायरस चे गंभीर संकट देशासमोर आहे हया धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मोठयाप्रमाणावर भाविक सहभागी होत असल्याने हया माध्यमातुन होणारा संभाव्य धोका टाळण्याकरीता म्हणुन सवॅ कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
       हयावर्षी 6 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती निमित्त महावीरांचा जन्माभिषेक सोहळा प्रदिपभाऊ भिसीकर व भरतभाऊ भोरे हयांच्याकडुन घरीच संपन्न झाला. त्याचवेळी प्रत्येक समाजबांधवांनी आपआपल्या घरी महावीरांचा जन्माभिषेक सोहळा साजरा केला तसेच प .पु जैन आचार्य , साधु संत व स्वाध्वी जी आदींनी महावीर जयंती घरी कशी साजरी करावयाची आहे ह्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन केले होते .त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जावून प्रत्येक समाजबांधवांनी आपल्या घरीच महावीर जयंती साजरी केली तसेच सायंकाळी घराच्या अंगणात रांगोळी काढुन दिवे लावले त्यानंतर महावीरांची आराधना , स्तृती , सामायिक , आरती व णमोकार महामंत्रांचा जाप करुन देश कोरोना मुक्त करण्याकरीता प्रार्थना केली. तसेच दिंगबर जैन सेवादल व बघेळवाळ संघ कारंजा लाड शाखेच्या वतीने ह्या वेळी 100 गरीब गरजु व्यक्तिंना धान्याची किट्स चे माननीय तहसीलदार मांजरे साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले ह्या वेळी भगवान महावीर जयंती महोत्सव समिति चे सचिव अॅड संदेश जैन जिंतुरकर , मनिष भेलांंडे , प्रफुल्ल बांनगावकर सेवादलाचे भारत हरसुले , प्रसन्न आग्रेकर , सुदर्शन दर्यापुरकर , पराग गहाणकरी , विजय जिंतुरकर , धनंजय गहाणकरी , आनंद चवरे , संदीप दर्यापुरकर  व नितीन जैन आदी उपस्थित होते.